Shirpur Police Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Police : वन जमिनीवर गांजा शेती; शिरपूर पोलिसांकडून छापा टाकत शेती उध्वस्त

Dhule News : धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शेतातील पिकांमध्ये गांजाची झाले लागवड करत चोरून शेती करण्यात येत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. त्यानुसार शिरपूर तालुक्यात देखील पुन्हा एकदा समोर आले

भूषण अहिरे

धुळे : गांजा अवैधपणे विक्री करण्यास मनाई आहे. असे असताना देखील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात छुप्या पद्धतीने गांजाची लागवड करून शेती करण्यात येत असते. त्यानुसार शिरपूर तालुक्याच्या दुर्गम भागात वन जमिनीवर गांजाची शेती करण्यात येत होती. याठिकाणी शिरपूर तालुका पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली असून गांज्याची शेती उध्वस्त केली आहे. 

गांजा विक्री करण्यास बंदी आहे. मात्र अनेकजण छुप्या पद्धतीने गांजाची शेती करत असल्याचे समोर आले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शेतातील पिकांमध्ये गांजाची झाले लागवड करत चोरून शेती करण्यात येत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. त्यानुसार शिरपूर तालुक्यात देखील पुन्हा एकदा समोर आले आहे. 

पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई 
शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बोरमळीपाडा येथील वन जमिनीवर गांजाची लागवड करण्यात आली होती. याबाबत शिरपूर तालुका पोलिसांना गुप्त माहितीदाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, शिरपूर तालुका पोलिसांनी बोरमळीपाडा येथे छापा टाकला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गांज्याची शेती पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी सदर गांज्याची शेती उध्वस्त केली आहे. 

३८०० किलो गांजा जप्त 
कारवाईमध्ये जवळपास ३८०० किलो गांजा यावेळी पोलिसांना आढळून आला आहे. ज्याची बाजारामध्ये जवळपास ७६ लाख रुपये इतकी किंमत मानली जात आहे. या कारवाई मध्ये दोघा जणांच्या शिरपूर तालुका पोलिसांनी मुसक्या देखील आवळल्या असून त्यांच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा देखील पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइनेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT