Dhule Crime news Saam Tv Marathi
महाराष्ट्र

धुळ्यात अवैध देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; झोपड्यांवरही बुलडोझर फिरवला

Shirpur police and municipal team demolishing encroached huts: शिरपूरमधील मांडळ चौफुली परिसरात कथित देहविक्री व्यवसायावर मोठी कारवाई.

Bhagyashree Kamble

धुळ्यातील शिरपूर शहरातील मांडळ चौफुली परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. याची माहिती मिळताच शहर पोलीस आणि नगरपरिषदेनं संयुक्तपणे मोठी कारवाई केली. या बेकायदेशीर व्यवसायाबाबत वेळोवेळी पोलिसांना माहिती देण्यात आली होती. अखेर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाविरोधात कडक पावले उचलली.

शिरपूर शहरातील मांडळ चौफुली परिसरात काही महिलांकडून कथित देहविक्रीचा अवैध व्यवसाय सुरू होता. दीर्घकाळापासून हा अवैध व्यवसाय महिलांकडून सुरू होता. या बेकायदेशीर व्यवसायाबाबत वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात होते. या प्रकरणावर अखेर पोलिसांनी लक्ष घातले. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कडक पावली उचलली आहेत.

या कारवाईदरम्यान, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुलडोझरच्या सहाय्याने परिसरातील अतिक्रमित झोपड्या आणि शेड हटवण्याची मोहिम राबवली गेली. बराच काळ या भागात सुरू असलेल्या अवैध प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. यासंदर्भात अनेकांनी तक्रारीही नोंदवल्या होत्या. या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

चालत्या गाडीतून धूम स्टाईल लुटमार

सोलापूर ते धुळे महामार्गावर पाचोड ते येडशीदरम्यान प्रवासी वाहन अडवून अथवा थांबलेल्या वाहनातील प्रवाशांना धमकावून लूटमार केली जात आहे. याबरोबरच ट्रॅव्हल्सवर ठेवलेल्या बॅग लंपास करण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत आता बीड पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून, अशा पद्धतीने चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेतला जात आहे. यासाठी हॉटेल चालकांची देखील मदत घेतली जात असून, सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. याबरोबरच प्रवाशांनी देखील खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : किचन सिंकमध्ये घाण साठते, घरभर दुर्गंध येतो? मग या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: आता कुठलाच वेगळा ब्रँड शिल्लक नाही - सामंत

Pune : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, ब्लॅक स्पॉटवर स्कूल बस आणि कारची धडक

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंकडून फिल्डिंग, विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आग्रही

Instant Noodles: आठवड्यातून दोन वेळा नूडल्स खाताय? आताच व्हा सावध , अन्यथा 'या' गंभीर आजाराचा वाढेल धोका

SCROLL FOR NEXT