धुळे : धुळे जिल्ह्यातील लोहगाव वसमाने कळगाव कुंभारे या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. या पावसाने पपई, केळी, मका, कापूस पिक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाने लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेती पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.
राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात कालपासून पावसाळा सुरवात झाली आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यात देखील जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शिंदखेडा तालुक्यात संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन, कपाशी, तूर यांसारखी खरीप पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हेक्टरी ५० हजार भरपाईची मागणी
शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्याने शासनाने तात्काळ मदतीची घोषणा करून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतर्फे होत आहे. तालुक्यातील व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती जलमय झाली असून सोयाबीन पिकावर कोंब फुटल्याने पीक घरात येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. कपाशीचे बोंड, पात्या, फुले उन्मळून खाली पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस
नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यात नंदुरबार तालुक्यातील आष्टे आणि चोपाडे शिवारात पपई पीक खराब झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे पपईचे साडेतीन हजार झाडे उलमडून पडल्याने तीन ते चार लाखांचा खर्च मातीमोल झाला असून हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. काही दिवसातच तोडणीला आलेली पपई पावसामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांचे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.