शिरपूर (धुळे) : संसाररूपी नव्या आयुष्याला सुरवातच झाली असताना होत्याचे नव्हते झाले. अवघ्या काही दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेला युवक अपघातात ठार झाला. चेतन रमेश सोलंकी (वय २६, रा.पळासनेर ता.शिरपूर) असे मृताचे नाव आहे. (dhule-news-has-been-only-20-days-since-the-marriage-and-Accidental-death-of-a-youth)
पुणे (Pune) येथील उद्योगसमूहात मेकॅनिकल इंजिनिअर पदावर कार्यरत असलेल्या चेतनचा नऊ डिसेंबरला धुळे (Dhule) येथे थाटात विवाह झाला होता. पाच दिवसांपूर्वी पत्नीला घेऊन तो पुण्याला गेला होता. मंगळवारी (२८ डिसेंबर) मुंबई- बंगळुरू (Mumbai Bangalore Highway) बाह्यवळण महामार्गावर भूमकर पुलाखाली बसची वाट बघत उभा असताना साताऱ्याच्या दिशेने जाण्यासाठी पुलावरून निघालेल्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित होऊन उतारावरून भरधाव वेगात खाली आला. टेम्पोच्या धडकेत तीन जण ठार तर चार जण जखमी झाले. मृतांत चेतन सोलंकीचाही समावेश होता.
गावावर शोककळा
पळासनेर येथील रमेश सोलंकी यांचा चेतन हा एकुलता मुलगा होता. मोलमजुरी करून सोलंकी यांनी मुलास उच्चशिक्षित केले होते. नोकरी व विवाहानंतर स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात असतानाच चेतनचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबाबत माहिती मिळताच पळासनेर गावावर शोककळा पसरली. लग्नानंतर (Marriage) अवघ्या २० दिवसांतच त्याच्या पत्नीला वैधव्य प्राप्त झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. चेतनच्या पार्थिवावर पळासनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन बहिणी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.