Dhule Farmer Saam tv
महाराष्ट्र

Dhule Farmer : ओल्या दुष्काळातून वगळल्याने शेतकरी आक्रमक; निमगुळमध्ये ग्रामपंचायतीसमोर आंदोलन

Dhule News : अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान मका उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. मात्र धुळे तालुक्यातील वगळण्यात आलेल्या गावांना तातडीने ओला दुष्काळात समाविष्ट करून नुकसान भरपाई द्यावी, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली,

भूषण अहिरे

धुळे : राज्यात जवळपास सर्वच भागात मुसळधार पाऊस होऊन पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारे उत्पादन शून्य असल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. अशात धुळे तालुक्यातील काही गावांना ओल्या दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यामुळे या गावातील शेतकरी आक्रमक झाले असून ग्रामपंचायतीसमोर आंदोलन उभारण्यात आले आहे. 

धुळे जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान धुळे तालुक्यातील शिरूड, निमगुळ, धामणगाव, बोधगाव आणि बाबरे या गावांना शासनाने ओल्या दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यादीतून वगळण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी निमगुळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार आंदोलन केले. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही शासनाने या गावांना वगळून अन्याय केला असल्याची भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलन दरम्यान, 'ओला दुष्काळ त्वरित जाहीर करा' अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.  जर प्रशासनाने ओला दुष्काळाच्या यादीमध्ये या गावांचा समावेश केला नाही; तर यापुढील आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा देखील संतप्त शेतकरी आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे.

काढून ठेवलेल्या मक्यातून कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शिरपूर तालुक्यात मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी पेरणीपासून तर काढणीपर्यंत तालुक्यात पावसाने दाणादाण केल्याने मक्का पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक काढणीच्या शेवटच्या काळात जिल्हाभरात अतिवृष्टीसदृश पावसामुळे मका पीक पूर्णतः भिजल्याने काही ठिकाणी या दोन्ही पिकांना कोंब फुटल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multicolor Blouse Designs: साध्या साडीवर मल्टीकलर ब्लाउज ब्लाउज दिसेल परफेक्ट, तुम्हीच दिसाल ग्लॅमरस

Maharashtra Live News Update: बीडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी स्वीकारला पदभार

Bhendi Bhaji Recipe: हिरवी मिरची टाकून भेंडीची भाजी कशी बनवायची?

New Year Trip 2026 : नवीन वर्षात 'ही' 8 ठिकाणं नक्की फिरा, गर्दी-गोंधळापासून दूर शांतता अनुभवाल

20-25 हजारांमध्ये मुली मिळतात; भाजप मंत्र्यांच्या पतीने अकलेचे तारे तोडले, VIDEO

SCROLL FOR NEXT