Robbery 
महाराष्ट्र

कुटूंब दिवाळीसाठी बाहेरगावी; चोरट्यांनी फोडली दोन घर

कुटूंब दिवाळीसाठी बाहेरगावी; चोरट्यांनी फोडली दोन घर

भूषण अहिरे

धुळे : ऐन सणासुदीच्या काळात धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. दिवाळीनिमित्‍ताने कुटुंबिय बाहेरगावी गेले असल्‍याची संधी साधून एकाच परिसरात दोन घरे फोडल्‍याची घटना उघड झाली आहे. आता दिवाळीनंतर बहुतेकजण गावी जात असल्‍याने चोरीच्‍या घटना होवू नये याचे आव्‍हान पोलिसांसमोर आहे. (dhule-news-Family-out-of-town-for-Diwali-and-thief-into-two-houses)

दिवाळी सणाच्या काळात धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ वाढल्याचे दिसून येत आहे. धुळे शहरातील अनमोलनगर येथील एकाच परिसरात दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. दिवाळी सणानिमित्त दोन्ही घरातील कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी या दोन्ही घरांवर डल्ला मारला आहे.

एका घरातून तीस हजाराचा ऐवज लंपास

दिनेश पाटील व पियुष नेमाने या कुटुंबीयांच्या घरावरती चोरट्यांनी हात साफ केला आहे. परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधित चोरी झालेल्या घरमालकांना फोन करून चोरी संदर्भातील माहिती दिली आहे. एका घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास पंचवीस ते तीस हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरे घर मालक अद्याप घरी पोहोचू शकले नसल्यामुळे त्या घरातील चोरीचा अंदाज लावणे शक्य नसल्यामुळे घटनेची माहिती मिळताच पश्‍चिम देवपूर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT