Mahavitaran Bill Saam tv
महाराष्ट्र

Mahavitaran Bill : झोपडीत राहणाऱ्या वृद्धेला ८३ हजारांचे विजबिल; महावितरणच्या भोंगळ कारभाराची पोलखोल

Dhule Mahavitaran News : घरात ना फ्रिज, ना टीव्ही असून केवळ एक पंखा आणि एक बल्ब असतानाही इतक्या प्रचंड रकमेचे बिल आल्याने महावितरण विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

भूषण अहिरे

धुळे : महावितरणकडून अवाजवी बिलाची आकारणी केली जात असल्याची ओरड मागील काही दिवसात वाढली आहे. यातच शिरपूर तालुक्यातील लौकी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झोपडीत राहणाऱ्या आणि मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या एका ७० वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेला तब्बल ८३ हजार रुपयांचे विजबिल महावितरण विभागाने पाठविले आहे. यावरून महावितरणच्या भोंगळ कारभाराची पोलखोल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

वीज ग्राहकांच्या घरोघरी जाऊन नवीन वीज मीटर बसविण्यात येत आहेत. याबाबत परवानगी नसताना वीज मीटर बदल्यानंतर ग्राहकांकडून ओरड सुरु आहे. तर ज्यांचे मीटर बदलण्यात आले आहेत. त्यांच्या वीज बिलात दुप्पटीने वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. इतकेच नाही तर विजेचा अधिक वापर नसताना देखील सरासरी बिलाची आकारणी करून वीज बिल ग्राहकांना दिले जात आहे. असाच प्रकार शिरपूर तालुक्यात समोर आला असून झोपडीत राहणाऱ्या वृद्धेला ८३ हजारांचे बिल दिले आहे. 

दोन महिन्यांपासून सुरु आहे प्रकार 

इंदूबाई हिरालाल भील असे या महिलेचे नाव असून हि वृद्धा आपला मुलगा, सून आणि नातवंडांसह लौकी येथील एका झोपडीत राहतात. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात वीज जोडणी झाली होती. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना सरासरीपेक्षा हजारो पट अधिक म्हणजेच ८० हजारांहून जास्त विज बिल येत आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आहे. 

झोपडीत केवळ एक फॅन व लाईट 
दरम्यान इंदूबाई यांच्या मुलाने वारंवार महावितरण कार्यालयात तक्रारी केली. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वृद्ध महिलेवर अन्याय झाल्याचे ग्रामस्थांचे मत असून घरात केवळ एक लाईट आणि फॅन असूनही एवढे बिल येणे हे अजबच आहे. योग्य चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे; अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किन्नरांच्या दोन गटात वाद, 1,500,000,000 रुपयांची संपत्ती; इंदूरच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

रस्त्यावरची दहशत कमी करण्यासाठी पुण्यात भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करण्याचा नवा मार्ग

Diwali Pahat: दिवाळी पहाटचा कार्यक्रम पाहायचाय? तर मुंबईतील 'या' ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे प्रसूती यशस्वीरित्या पार पाडणारा रिअल हिरो

Yuvraj Singh : वडिलांना साधा कुर्ता घेत नाही पण 'त्या' बाबाला १५ लाखांचं घड्याळ देतो, युवराज सिंगवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT