Akola : नियमबाह्य निविदा प्रक्रिया भोवली; जिल्हा शल्यचिकित्सकसह दोघांवर निलंबनाची कारवाई

Akola News : प्रक्रियेमध्ये ३० ते ४० निविदाकारांनी भाग घेतला परंतु त्यातील केवळ चारच निवेदकांना तांत्रिक लिफाफा उघडण्यासाठी सहभागी करून घेणे, त्यापैकीही केवळ दोनच पात्र दर्शविण्यात आले
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु विभागात भरती प्रक्रिया राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र हि संपूर्ण प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याला जबाबदार धरत जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.  

अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेसंदर्भात पावसाळी अधिवेशनात वाशिमचे भाजप आमदार श्याम खोडे यांनी विधानसभेत निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला होता. यात आपल्या मर्जीतील लोकांना कंत्राट मिळण्यासाठी या तिघांनीही निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले होते. ७२ निविदेतल्या फक्त चार निविदा अंतिम ठरवत त्यातील दोघांच्याच निविदा अधिकृत केल्या होत्या.

Akola News
Hingoli : वाळू माफियांची मुजोरी उतरविली; डेप्युटी कलेक्टरकडून धिंड काढत शहरभर फिरवले

तिघांवर निलंबनाची कारवाई 

अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी सन २०२४-२५ मध्ये ३१ जागा भरण्यासाठी ई निविदा प्रक्रियेतील घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया नियमबाह्य आणि अतांत्रिक पद्धतीने करण्यात आल्यावरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्यासह दोन उच्च पदस्थ अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जयंत पाटील आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी ए.एन. डांबरे यांचा यात समावेश आहे.

Akola News
ZP School Teacher : जिल्हा परिषद शाळेतील १२०० शिक्षकांवर शिस्तभंग कारवाई; मुख्यालयी राहत नसल्याने वेतनवाढ रोखण्याबाबत नोटीस

विभागीय चौकशी होणार 

या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार चौकशी समितीच्या अहवालात उघड झाला होता. त्यानुसार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेशावरून तिन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून निलंबनानंतर तिन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार आहे. एकाच वेळी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने अकोल्याच्या आरोग्य विभागाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com