महाराष्ट्र

नाबार्डद्वारा धुळे जिल्हा बॅंकेस एटीएमसाठी सहाय्य

नाबार्डद्वारा धुळे जिल्हा बॅंकेस एटीएमसाठी सहाय्य

Rajesh Sonwane

धुळे : बदलत्या युगासोबत जिल्हा बँकही तंत्रज्ञानाचा वापर करू लागली आहे. आज काल ग्रामीण भागातील रहिवासीही आर्थिक व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डचा वापर करत आहेत. पण बऱ्याचदा राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये कॅश संपलेली असते. त्यामुळे कॅश काढण्यासाठीही बँकांमध्ये लांबच लांब रांग लागलेली दिसते. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आता मायक्रो एटीएम हे नवीन तंत्रज्ञान आले आहे. नाबार्डद्वारे असे दोनशे मशिन खरेदीसाठी धुळे- नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेला आर्थिक सहाय्य दिले जाईल. (dhule-news-district-bank-atm-by-nabard-funding)

मायक्रो एटीएममध्ये कार्ड टाकून आणि आपला गोपनीय पिन क्रमांक टाकल्यानंतर पैसे जमा करता येतात किंवा काढता येतात. पारंपारिक एटीएमचा खर्च या मायक्रो एटीएममुळे वाचणार आहे. नाबार्डने जिल्हा बँकेला अशी २०० मायक्रो एटीएम मशीन्स घेण्यासाठी ४५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.

किराणा दुकान, बाजार समित्यांमध्‍येही देणार मशिन

काही महिन्यांत जिल्हा बँकेद्वारा ही मायक्रो एटीएम मशिन्स जिल्हा बँकेच्या सर्व शाखांत तसेच जिल्हा बँकेच्या काही निवडक सोसायट्यांमध्ये, गावागावांतील किराणा दुकान, बाजार समित्या आदी ठिकाणी देण्यात येतील. या मशीन्समध्ये कोणत्याही बॅंकेचे कार्ड स्वीकारले जाईल. यासाठी जिल्हा बँकेद्वारा ग्राहकाकडून कोणतेही अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाणार नाही.

डिजिटल व कॅशलेस व्‍यवहार

रिझर्व बँक आणि नाबार्डच्या धोरणानुसार या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात वित्तीय साक्षरता आणि वित्तीय समावेशनाचे लक्ष साध्य होईल आणि जास्तीत जास्त लोक डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार करू शकतील, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, जिल्हा बँकेचे सीईओ धीरज चौधरी आणि नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विवेक पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Tourism: गारेगार वातावरणात पिकनीकला जाताय? साताऱ्यातील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra Live News Update : राजगुरुनगर नगरपरिषदेतील कामगारांचं आंदोलन!

Winter Skin Care : सावधान! हिवाळ्यातही चेहऱ्याला वारंवार बर्फ लावताय? मग 'ही' गोष्ट लक्षात घ्या

मविआमध्ये राज ठाकरे पाहिजेच, उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, बैठकीत नेमके काय घडले? VIDEO

कोणत्या भाजीमध्ये खोबरं वापरू नये? भाजीची चव बिघडेल

SCROLL FOR NEXT