Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime News: आईच्या उत्तर कार्याच्या खर्चावरून वाद; मारहाणीत जखमीचा मृत्यू

आईच्या उत्तर कार्याच्या खर्चावरून वाद; मारहाणीत जखमीचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

धुळे : आईच्या उत्तर कार्यासाठी आलेल्या खर्चावरून वाद घालून एकास जबर मारहाण करण्यात आली. त्यात तो जखमी झाला. त्यास उपचारासाठी (Dhule) नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेत ज्ञानेश्वर नामदेव शिंदे (वय ४५, रा. नथ्थूबाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे) यांना जीव गमवावा लागला. या घटनेच्या अनुषंगाने त्यांची पत्नी आशाबाई शिंदे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार धुळे शहर पोलिस (Police) ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. (Latest Marathi News)

पीडित आशाबाई ज्ञानेश्वर शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ६ जूनला त्यांच्‍या सासू केसरबाई नामदेव शिंदे यांच्या उत्तर कार्यासाठी पती ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांच्यासोबत धुळे शहरातील मोहाडी उपनगरात गेल्या. या ठिकाणी त्यांचे पुतणे, जेठानी, भाचे, भाची व नणंद आदींनी उत्तर कार्याच्या खर्चावरून ज्ञानेश्वर शिंदे यांच्याशी वाद घातला. हा वाद सतत तीन दिवस चालत राहिल्यानंतर १६ जूनला (Crime News) सायंकाळी सहाला भाचा मनोज सोनवणे, सागर सोनवणे, जेठानी रंजना शिंदे, पुतणे चेतन शिंदे, मयूर शिंदे, सचिन शिंदे, नणंद सकुबाई, छोटी, विमल, भाच्या राणी व सोनी, पाहुणे जगू सोनवणे, पुतणी, कामिनी आदींनी एकत्र येत ज्ञानेश्वर शिंदे व आशाबाई शिंदे यांना शिवीगाळ केली. वाद विकोपास गेला व या दोघांनाही मारहाण करण्यात आली.

मनोज सोनवणे याने त्याच्या हातातील काठीने ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पाठीत मारहाण केली. पुतणी कामिनी हिने वीट मारून फेकली. या हाणामारीत ज्ञानेश्वर हे जखमी झाले. त्याचवेळी घटनास्थळी पोलिसांना बोलविण्यात आले. पोलिसांनी वाहनात बसवून त्यांना नेण्याचा प्रयत्न केला असता अग्रसेन पुतळ्याजवळ ज्ञानेश्वर शिंदे यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने रुग्णवाहिकेतून त्यांना नवीन जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणीअंती ज्ञानेश्वर शिंदे यांना मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pasta Recipe: हॉटेलमध्ये ३०० रुपयांना मिळणारा पास्ता १० मिनिटांत बनवा घरीच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT