Dhule Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Dhule Vidhan Sabha : धुळे शहर मतदार संघात बंडखोरी; शिंदे गटाच्या नेत्याचा प्रहार संघटनेत प्रवेश करत उमेदवारी

Dhule News : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी सुरूच आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघात बंडखोरी झाल्यानंतर आता धुळे शहर मतदार संघात देखील बंडखोरी झाली आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत धुळे शहर मतदार संघात बंडखोरी केली आहे. मनोज मोरे यांनी प्रहार संघटनेच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे धुळे शहरात देखील आता तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी सुरूच आहे. (Dhule) धुळे ग्रामीण मतदारसंघात बंडखोरी झाल्यानंतर आता धुळे शहर मतदार संघात देखील बंडखोरी झाली आहे. यात महायुतीतील (Mahayuti) भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना धुळे शहर विधानसभेची जागा जाहीर झाल्यामुळे शिंदे गटाचे मनोज मोरे नाराज होते. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण उमेदवारी करत असून, या मतदारसंघांमध्ये भगवा आमदार झाला पाहिजे. त्यामुळे आपण उमेदवारी करत असल्याचा मनोज मोरे यांनी यावेळी सांगितलं आहे. 

मोरे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोरे यांनी शिवसेना शिंदे गटाचा पदाचाही राजीनामा दिला असून, प्रहार संघटनेत प्रवेश केला आहे. यामुळे विजय आपलाच होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे धुळे शहर मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता भाजप, शिवसेना ठाकरे गट व प्रहार संघटना असे तीन उमेदवार रिंगणात असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : भाजपचा प्लान ठरला! नेत्यांनी उपसलेले बंडाचे हत्यार करणार म्यान

Maharashtra News Live Updates: सलमान खान आणि झिशान सिद्धिका यांना धमकी देणाऱ्याला अटक

Thackeray Group Star Campaigner list : ठाकरे गट प्रचाराचा धुरळा उडवणार; २४ प्रचारकांची यादी जाहीर

Mumbai Travel : मुंबईत रात्रीच्या वेळी 'हे' ठिकाण आवर्जून पाहा

Maharashtra Politics : मुलगी वडिलांना कधीच प्रश्न विचारत नाही; अजित पवारांच्या आरोपांवर स्मिता पाटील भरभरून बोलल्या

SCROLL FOR NEXT