Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: दगडफेक करून भाविकांना लुटले; दरोडेखोर २४ तासात पोलिसांच्‍या ताब्‍यात

दगडफेक करून भाविकांना लुटले; दरोडेखोर २४ तासात पोलिसांच्‍या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : उज्जैन येथून देवदर्शन करून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांच्‍या कारवर दगडफेक करून लुटले (Robbery) होते. भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Dhule LCB) पथकाने मुद्देमालासह मूसक्या आवळल्या आहेत. (Tajya Batmya)

उज्जैन येथून देवदर्शन करून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांनी वाहन आराम करण्यासाठी धुळे (Dhule) तालुक्यातील आर्वी या परिसरामध्ये मुंबई– आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) थांबवले होते. पहाटेच्या दरम्यान काही दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा उचलत या भाविकांच्या वाहनावर दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील ऐवज घेऊन त्यांना मारहाण करून पोबारा केल्याची घटना पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली होती. या संदर्भात धुळे तालुका पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता.

हत्‍यार, वाहनासह तीन ताब्‍यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता या दरोडेखोरांच्या मूसक्या 24 तासाच्या आत आवळण्यात यश आले आहे. त्या चोरट्यांकडून त्यांनी लुटलेला मुद्देमाल त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेले हत्यार व या दरोड्यात वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. या दरोडेखोरांपैकी तीन दरोडेखोरांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या असून, हे तिघेही दरोडेखोर नांदेड येथील असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे देखील उघडकीस आले आहे. फरार आरोपींचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: पुण्यातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी

School Holiday: शाळा-कॉलेज उद्याही बंद राहणार, कुठे-कुठे घेण्यात आला सुट्टीचा निर्णय? वाचा सविस्तर

Chanakya Niti : नवरा बायकोत 'ही' गोष्ट नसेल तर तुटेल नातं

Mumbai Tourism : पावसाळ्यात जोडीदारासोबत जा रोमँटिक लाँग ड्राईव्हवर, मुंबईतील ५ बेस्ट लोकेशन

Shocking News : आईने दोन पेग घेतले त्यानंतर..., हत्या करून निळ्या ड्रममध्ये मृतदेह लपवला, चिमुकल्यानं सांगितलं वडिलांसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT