Chandrapur News
Chandrapur NewsSaam tv

Chandrapur News: मोफत वीजेसाठी विधानभवनावर अधिकार रॅली; अपक्ष आमदाराचा पुढाकार

मोफत वीजेसाठी विधानभवनावर अधिकार रॅली; अपक्ष आमदाराचा पुढाकार
Published on

चंद्रपूर : वीज उत्पादक जिल्हा असल्याने चंद्रपूरच्या नागरिकांना 200 युनिट वीज मोफत मिळावी. यासाठी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी विधान भवनावर (Vidhan Bhavan) अधिकार रॅली काढली. (Live Marathi News)

Chandrapur News
Jalgaon News: मुंबई फिरून परतताना गाठले मृत्‍यूने; कार टँकर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

चंद्रपूर (Chandrapur News) शहरातील गांधी चौकातून ही रॅली निघाली असून, ती नागपूर (Nagpur) येथे विधान भवनावर धडकणार आहे. ही मोटर सायकल रॅली असून यात युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. या रॅलीचे रूपांतर नागपुरात गेल्यावर मोर्चात होणार आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार आणि सध्या शिंदे गटाला पाठिंबा देणारे किशोर जोरगेवार यांनी विधानसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या नागरिकांना 200 युनिट वीज मोफत मिळवून देण्याची घोषणा केली होती. या घोषणेचा त्यांना लाभही झाला आणि ते विधानसभेत गेले.

आता नागरीकांमध्‍ये असंतोष

अजूनही हे आश्वासन पूर्ण झाले नसल्याने नागरिकांमध्‍ये असंतोष पसरत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज सरकारकडे मोर्चाद्वारे मागणी रेटण्यासाठी अधिकार रॅली काढली. चंद्रपूर जिल्हा वीज उत्पादक जिल्हा असल्याने नागरिकांना 200 युनिट वीज मोफत मिळावी आणि उद्योगांना सवलतीच्या दरात ती उपलब्ध करावी; अशी त्यांची मागणी आहे. आता या मागणीला सरकार किती प्रतिसाद देते, याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com