Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: कॉलेजसाठी निघाली अन्‌ काही वेळातच आलेल्‍या फोनने कुटुंब हादरले

कॉलेजसाठी निघाली अन्‌ काही वेळातच आलेल्‍या फोनने कुटुंब हादरले

साम टिव्ही ब्युरो

धुळे : कॉलेजला जाते, असे सांगून दुचाकी घेऊन घराबाहेर पडलेल्या तरुणीने नकाणे तलावात आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी (ता.१२) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी धुळे पोलिसात (Dhule Police) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. (Live Marathi News)

चेतना पुरुषोत्तम पाटील (वय २२, रा. प्लॉट क्रमांक-१८, यशोधन कॉलनी, वलवाडी, देवपूर धुळे) असे मृत (Dhule News) तरुणीचे नाव आहे. चेतना ही सोमवारी (१२ डिसेंबर) सकाळी पावणेसात ते सातच्या सुमारास कॉलेजला जाते असे सांगून दुचाकीने घरून निघाली. त्यानंतर सकाळी नऊला तिचे आजोबा काशिनाथ खंडू काकुळदे यांना माहिती मिळाली, की तुमची दुचाकी नकाणे तलावाजवळ उभी आहे. तलावात एका मुलीचा मृतदेह तरंगत आहे.

कारण गुलदस्‍त्‍यात

माहिती मिळताच त्यांनी कुटुंबीयांसह घटनास्थळी धाव घेतली. चेतनाचा मृतदेह तलावात तरंगताना दिसून आला. या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला. मृत चेतनाचे वडील पुरुषोत्तम पाटील हे पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतात. ते वरच्या मजल्यावर राहतात. चेतना आठ महिन्यांची असतानापासून आजोबा व आजी तिचा सांभाळ करत होते. तिच्या आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips For Men And Women: वजन कमी करण्यासाठी 6 सोप्या सवयी, ज्या महिलांसह पुरूषांनीही फॉलो कराव्यात

Manoj Jarange: 'माझ्या नादी लागू नका, हा बॉम्ब होता, नंतर अणुबॉम्ब टाकणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Breaking News : मनोज जरांगेंनी टाकला मोठा ऑडिओ बॉम्ब, ५०० कोटींच्या आरोपांचा थेट पुरावाच दाखवला

Cleaning Tips : इंडक्शन साफ करताना स्क्रॅच पडतात का? जाणून घ्या साफ करण्याच्या ५ सोप्या पद्धती

Maharashtra News Live Update: इथेनॉलबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना मोठा झटका

SCROLL FOR NEXT