Saam TV News
कोणताही डाग किंवा चिकटपणा स्क्रॅच न पाडता मिनिटांत करा स्वच्छ.
सफाईपूर्वी इंडक्शन बंद करून पूर्ण थंड होऊ द्या.
लोखंडी जुना किंवा कडक स्क्रबर वापरल्यास काचावर स्क्रॅच पडू शकतात.
पाणी आत गेल्यास वायरिंग खराब होण्याचा धोका असतो.
एका कटोरीत कोमट पाणी घेऊन त्यात ३-४ थेंब लिक्विड डिशवॉश टाका. सुती कापड किंवा स्पंज त्या पाण्यात भिजवून नीट पिळून घ्या. इंडक्शन पुसून घ्या आणि नंतर कोरड्या कपड्याने स्वच्छ करा.
काचावरील जळलेल्या किंवा जिद्दी डागांवर थोडा बेकिंग सोडा शिंपडा. अर्ध्या लिंबाने सोड्यावर हलक्या हाताने घासून घ्या. ५ मिनिटांनंतर ओल्या कपड्याने डाग स्वच्छ पुसून घ्या.
स्प्रे बाटलीमध्ये समान प्रमाणात पाणी आणि व्हिनेगर मिसळा. इंडक्शनवर हे द्रावण स्प्रे करा आणि २ मिनिटे तसेच ठेवा. मायक्रोफायबर कपड्याने पुसून काच स्वच्छ करा.
स्वयंपाक झाल्यावर इंडक्शन हलके कोमट असतानाच कोरड्या कपड्याने पुसा.
भांड्यांचा खालचा भाग स्वच्छ ठेवल्यास काचावर डाग पडणार नाहीत.
नेहमी सॉफ्ट मायक्रोफायबर कपड्याचाच वापर करा.
रोजची धुळ व चिकटपणासाठी कोमट पाणी आणिलिक्विड डिशवॉश
जळलेले दूध व हट्टी डागांसाठी बेकिंग सोडा आणि लिंबू
पांढरे डाग व तेलकटपणा असेल तर पांढरा व्हिनेगर वापरा
या सोप्या टिप्स वापरून इंडक्शन कुकटॉप दीर्घकाळ स्वच्छ आणि सुरक्षित ठेवू शकता
NEXT : मृत्यूच्या २४ तास आधी शरीर देतं 'हे' ३ संकेत, वेळीच ओळखा!