Shreya Maskar
मृत्यूच्या आधी शरीरात अनेक बदल होतात. ती वेळीच ओळखणे आणि त्यावर उपचार करणे खूप गरजेचे आहे, व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे.
व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास कधी जलद, तर कधी मंद होतो. श्वास घेताना काही सेकंदाचा ब्रेक लागतो. श्वास घेताना घरघर किंवा घशातून आवाज येतो आणि श्वासोच्छ्वास अनियमित होतो.
हे बदल शरीराच्या कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे किंवा घशात स्राव जमा झाल्यामुळे होऊ शकतात. गंभीर आजाराच्या अंतिम टप्प्यात असे बदल दिसू शकतात.
रुग्णाला अन्न-पाणी घेण्याची इच्छा कमी होऊ शकते. शरीराची ऊर्जा कमी होणे आणि गिळण्यास त्रास होणे यामुळे खाणे-पिणे कठीण होते.
अशा वेळी रुग्णाला जबरदस्तीने खाऊ-पिऊ घालू नये. डॉक्टर किंवा नर्स यांच्या सल्ल्याने तोंडाची स्वच्छता राखणे, ओठ ओलसर ठेवणे आणि रुग्णाला आरामदायी स्थितीत ठेवणे महत्त्वाचे असते.
मृत्यूच्या जवळच्या टप्प्यात काही रुग्ण अधिक वेळ झोपू शकतात. त्यांना जागे करणे कठीण होऊ शकते किंवा ते आजूबाजूच्या व्यक्तींना कमी प्रतिसाद देतात.
काही व्यक्ती गोंधळल्यासारखे वागतात. अस्वस्थता किंवा ओळखीच्या व्यक्तींना ओळखण्यात अडचण येते. शरीराची ऊर्जा कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.