Stress Relief Flower : दिवसभराचा तणाव कमी करण्यासाठी मदत करेल 'हे' सुगंधी पांढरं फूल, घरात नक्की लावा याचं रोप

Shreya Maskar

ताण-तणाव

आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव सामान्य समस्या आहे. लोक तणावाचा सामना करण्यासाठी योग, ध्यान आणि औषधोपचार करतात. मात्र एक सुंदर, सुगंधी फुल तणाव कमी करण्यास मदत करू शकते, ते म्हणजे मोगऱ्याचे फूल

stress | pinterest

मोगऱ्याचे फूल

मोगऱ्याचा गोड, मंद सुगंध अनेकांना आवडतो. केसांत मोगऱ्याचा गजरा माळणे किंवा घरात मोगऱ्याची फुले ठेवल्याने मन प्रसन्न राहते.

Jasmine flower | pinterest

मानसिक तणाव कमी

मोगऱ्याचा सुगंध मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. काही व्यक्तींना शांत आणि आरामदायी वाटते. त्यामुळे तुम्ही आवर्जून घरात मोगऱ्याचे झाड लावा.

Reduce mental stress | pinterest

मोगरा-मेंदू

नाकाद्वारे सुगंधाचे संकेत मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे एखादा आवडता सुगंध घेतल्यावर मन प्रसन्न होते आणि जुन्या आठवणी ताज्या होतात.

smelling flower | pinterest

मन प्रसन्न वाटते

मोगऱ्याचा सुगंध आवडत असल्यास तो आनंददायी अनुभव देऊ शकतो. त्यामुळे काही व्यक्तींना मन हलके झाल्यासारखे वाटू शकते.

Jasmine flower | pinterest

विश्रांतीचा अनुभव

शांत वातावरणात मोगऱ्याचा मंद सुगंध घेतल्याने काही व्यक्तींना आराम मिळू शकतो. ध्यान किंवा श्वसनाच्या व्यायामासोबत याचा आनंद घेता येतो.

relaxing experience | pinterest

सुखद आठवणींशी संबंध

मोगऱ्याचा सुगंध सण, समारंभ किंवा आवडत्या व्यक्तींच्या आठवणींशी जोडलेला असू शकतो. अशा आठवणींमुळे मन प्रसन्न होऊ शकते.

pleasant memories | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

tips | pinterest

NEXT : गाढ झोप झाली तरी सकाळी उठल्यावर डोकं का भणभणतंय? 'या' ५ गंभीर चुका ठरू शकतात कारणीभूत

Sleep Mistakes | AI PHOTO
येथे क्लिक करा...