Shreya Maskar
रात्री ७ ते ९ तासांची झोप घेऊनही सकाळी उठल्यावर डोकं जड वाटणे, कपाळात ठणका जाणवणे किंवा डोकं भणभणत असेल तर रोजच्या या चुका कारणीभूत ठरतात.
रात्री शरीराला पुरेसे पाणी न मिळणे, दिवसभर कमी पाणी पिणे यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी, थकवा आणि तोंड कोरडे पडण्याचा त्रास होऊ शकतो.
कधी रात्री उशिरा झोपणे, कधी खूप उशिरा उठणे, तर कधी सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपणे यामुळे शरीराचे नैसर्गिक झोपेचे चक्र बिघडू शकते. झोपेच्या वेळेतील बदल आणि झोपेची खराब गुणवत्ता हे डोकेदुखीचे मुख्य कारण आहे.
अनेकजण झोपेत नकळत दात एकमेकांवर घासतात किंवा जबडा घट्ट आवळतात, यामुळे जबड्याच्या स्नायूंवर ताण येऊन सकाळी कपाळाजवळ किंवा डोक्याच्या दोन्ही बाजूंना वेदना जाणवू शकतात.
चहा, कॉफी हे कॅफिन युक्त पेय झोपेवर परिणाम करतात. झोपेचे तास पुरेसे असूनही झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. भरपूर कॅफिनमुळे डोकेदुखी वाढते.
स्लीप ॲप्नियामुळेही सकाळी डोके दुखते. या स्थितीत झोपताना श्वसनमार्ग वारंवार अरुंद किंवा बंद झाल्यामुळे श्वास घेण्यास अडथळा येतो आणि झोपेची गुणवत्ता बिघडते.
नियमित झोपेचे वेळापत्रक पाळा. दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि जेवणाच्या वेळा चुकवू नका.झोपताना मानेला योग्य आधार देणारी उशी वापरा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.