Sleeping : गाढ अन् शांत झोप लागत नाही?आजपासूनच टाळा रात्रीच्या 'या' ५ सवयी

Shreya Maskar

रात्रीची झोप

दिवसभर थकून आल्यावर रात्री गाढ झोप लागावी अशी सर्वांचीच इच्छा असते, मात्र काहींना गाढ आणि शांत झोप लागत नाही. मध्यरात्री झोप मोडही होते. यामागचे नेमकं कारण जाणून घेऊयात.

night sleep | pinterest

झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे

झोपण्यापूर्वी बराच वेळ मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरल्याने झोप येण्यास उशीर होतो. स्क्रीनचा प्रकाश आणि सतत मिळणारी माहिती मेंदूला जागृत ठेवते. झोपण्याच्या किमान ३० ते ६० मिनिटे आधी स्क्रीन वापरणे बंद करण्याचा प्रयत्न करा.

Using mobile before sleeping | pinterest

रात्री उशिरा चहा- कॉफी पिणे

चहा, कॉफी आणि काही एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफीन असते. कॅफीनचा परिणाम अनेक तास टिकू शकतो, त्यामुळे झोप लागण्यास अडथळा येऊ शकतो. झोपण्याच्या किमान ६ ते ८ तास आधी कॅफीन घेणे टाळा.

Drinking tea-coffee late at night | pinterest

झोपण्यापूर्वी जड जेवण करणे

रात्री अगदी झोपण्याच्या आधी भरपूर आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने अपचन, पोट फुगणे किंवा अॅसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे झोप अस्वस्थ होऊ शकते. झोपण्याच्या २ ते ३ तास आधी रात्रीचे जेवण पूर्ण करा.

Eating a heavy meal before bed | pinterest

झोपण्याची वेळ रोज बदलणे

झोपण्याची वेळ रोज एकच राहू दे नेहमी वेळा बदलत राहिल्या तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मध्यरात्री अचानक जाग येते.

Change bedtime daily | pinterest

झोपण्याची बेडरूम

तुम्ही ज्या बेडरूममध्ये झोपता तेथे खोलीत खूप प्रकाश, टीव्हीचा आवाज, उष्णता, अस्वस्थ वातावरण असल्यास झोप वारंवार मोडू शकते. खोली शक्यतो अंधारात, शांत आणि आरामदायक तापमानात ठेवा.

sleeping bedroom | pinterest

उपाय काय?

दररोज साधारण ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी पुस्तक वाचा, संगीत ऐका. संध्याकाळी मद्यपान टाळा.

What is the solution? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

Lips Care | AI PHOTO
येथे क्लिक करा...