Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

Shreya Maskar

ओठ फाटतात

हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या सर्वाधिक उद्भवते. मात्र तुमचे ओठ वर्षभर वारंवार फाटत असतील तर त्यांची विशेष काळजी घ्या. हे घरगुती उपाय करा. ओठ कापसासारखे मऊ होतील.

Lips split | pinterest

मॉइश्चरायझर

कोरड्या ओठांवर थेट लिप बाम लावू नये. आधी मॉइश्चरायझर लावा आणि मग लिप बाम लावा.

Moisturizer | pinterest

ओठ चाटण्याची सवय टाळा

ओठांना वारंवार जीभ लावणे टाळा. जेव्हा कोरडे ओठ अधिकच कोरडे होतात, तेव्हा अनेक लोक वारंवार आपले ओठ चाटतात. हे टाळा.ओठ चाटल्याने समस्या आणखी वाढू शकते. लाळेतील एन्झाइम्समुळे ओठांच्या नाजूक त्वचेला त्रास होऊ शकतो आणि लाळ सुकल्यानंतर ओठ पूर्वीपेक्षा जास्त कोरडे होतात.

Avoid the habit of licking your lips | pinterest

मॅट लिपस्टिकचा वापर कमी

मॅट लिपस्टिकच्या अतिवापरामुळे फाटलेल्या ओठांची समस्या आणखी वाढू शकते. काही काळासाठी मॅट लिपस्टिक वापरणे टाळा. त्याऐवजी, तुम्ही ग्लॉसी किंवा मॉइश्चरायझिंग लिपस्टिक वापरू शकता.

Use less matte lipstick | pinterest

पुरेसे पाणी प्या

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास ओठ कोरडे पडू शकतात. दिवसभर नियमितपणे पाणी प्या. तसेच डाएटमध्ये ज्यूसचा समावेश करा. नारळपाणी प्या.

Drink enough water | pinterest

खोबरेल तेल

खोबरेल तेल काही लोकांना ओठांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. सूर्यप्रकाशामुळे ओठांचा कोरडेपणा आणि नुकसान वाढू नये म्हणून चांगले लिप बाम वापरा.

Coconut oil | pinterest

'या' गोष्टीची घ्या खबरदारी

कोरड्या आणि फाटलेल्या ओठांची समस्या सहसा काही दिवसांतच सुटते. परंतु ओठ सतत फाटत असतील, रक्त येत असेल किंवा सूज आणि जळजळ होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Take care of 'this' thing | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Sleeping | AI PHOTO
येथे क्लिक करा...