Dhule Corona Update 
महाराष्ट्र

Dhule Corona: कोरोनाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाने आरोग्य यंत्रणा सज्ज

भूषण अहिरे

धुळे : संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाच्‍या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्‍यानुसार धुळ्यात देखील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. (Dhule news Corona update The health system is equipped with the increasing incidence of corona)

कोरोनाचा (Corona) प्रसार झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दुप्‍पटीने वाढत आहे. धुळे (Dhule) जिल्‍ह्यात देखील मागील दोन दिवसात रूग्‍णांचा आकडा वाढत असल्‍याचे दिसून आले. यासंदर्भात आरोग्य विभागातर्फे मेडिकल कॉलेज, याचबरोबर सिव्हील हॉस्पिटल तसेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Dhule Corona Update) तसेच उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन त्याचबरोबर व्हेंटिलेटर सज्ज करण्याचे आदेश देखील आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहेत.

सतराशे ऑक्‍सीजन बेड

आवश्यक औषधसाठा देखील उपलब्ध ठेवण्याचे आदेश संबंधित आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. यादरम्यान सतराशे ऑक्सिजन बेड, तीनशे व्हेंटिलेटरवर बेड आरोग्य विभागातर्फे सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी देखील कोरोना नियमांचे (Corona Rules) पालन करीत कुठल्याही प्रकारे आरोग्य संदर्भात त्रास जाणवल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधन्याचे देखील आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

SCROLL FOR NEXT