Cotton Price: पांढऱ्या सोन्याला दहा हजाराची झळाळी; शेतकऱ्यात समाधान

पांढऱ्या सोन्याला दहा हजाराची झळाळी; शेतकऱ्यात समाधान
cotton price
cotton price
Published On

परभणी : सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापुस लिलावात आज कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रूपये भावाची झळाळी मिळाली. यामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. (parbhani news Satisfaction in the farmer Cotton Price Ten thousand shillings of white gold)

cotton price
Farming: अवीट गोडी असलेली मेहरूणची बोरं..बांधावरचे पिक म्‍हणून उत्‍पादन

सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Selu Market Committee) पाथरी रोडवरील कापुस यार्डात झालेल्या शेतकऱ्यांचा (Farmer) कापूस लिलावात खरेदी करण्यात आला. या लिलावात तिनशे वाहनांची कापूस खरेदी करण्यात आली. यामध्ये जास्तीत जास्त दहा हजार सरासरी ९ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भाव (Cotton Price) मिळाला. शहरातील व्यापाऱ्यांनी १ लाख २५ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे.

स्‍वच्‍छ व पाणी विरहीत कापूस आणा

शेतकऱ्यांनी आपल्या कापसाला उच्चप्रतिचा भाव मिळावा; यासाठी स्वच्छ, कचरा व पाणी विरहीत कापूस विक्रीस आणण्याचे तसेच कापूस विक्रीसाठी सकाळी ९ वाजता मार्केट कमिटी यार्ड परिसरात आणून सोबत शेतकऱ्यांनी बँकेच्या पासबूकची झेराँक्स, आधार कार्ड (Aadhar Card) झेराँक्स सोबत आणण्याचे आवाहन बाजार समिती मुख्य प्रशासक रणजीत गजमल व प्रभारी सचिव राजीव वाघ यांनी केले आहे. या लिलावावेळी बाजार समितीचे कर्मचारी पूढाकार घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com