Farming: अवीट गोडी असलेली मेहरूणची बोरं..बांधावरचे पिक म्‍हणून उत्‍पादन

अवीट गोडी असलेली मेहरूणची बोरं..बांधावरचे पिक म्‍हणून उत्‍पादन
Mehrun Boron
Mehrun Boron
Published On

जळगाव : बोरांचे अनेक प्रकार पाहण्यास मिळतात. आंबट, तुरट चव असलेले गावरान बोर प्रत्‍येकालाच हवेहवे वाटतात. पण अवीट गोडी व आरोग्यवर्धक असलेल्या बोरांना देखील हंगामात नेहमीच मागणी असते. अशी अवीट गोडी असलेले बोरं म्‍हटले म्‍हणजे मेहरूणचीच आणि ती देखील (Jalgaon) जळगावमधील. (jalgaon news mehruns boron farming never goes sweetness)

Mehrun Boron
Crime News: एकीला पळवून नेत केला विवाह; ती घरात असताना पुन्‍हा अल्पवयीन मुलीचे केले अपहरण

खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्याला मागणीही खूप असते. त्यामुळेच त्यांचे दर सुरुवातीपासून अखेरपर्यंत टिकून राहतात. अनेक शेतकरी (Farmer) हे पीक बांधावरचे म्हणूनच घेतात. वेचणी, मजुरी, वाहतुकीव्यतिरिक्त फारसा खर्च या पिकाला येत नाही. त्यामुळे आर्थिक बळ देणारे महत्त्वाचे कोरडवाहू पीक म्हणून मेहरुणी बोरांकडे पाहिले जाते. मेहरूण शिवारातील शेतकरी (Mehrun Farming) बांधावरची शेती म्हणून बोरांचे उत्पादन घेतात.

मेहरूणी बोरांची चवच न्यारी

मेहरूणची बोरे आकाराने लहान, रसाळ व अवीट गोडीची आहेत. जळगाव शहरानजीकच्या मेहरूण शिवारात या बोरांची शेती पूर्वी केली जात होती. मेहरूणच्या बोरांची चव चाखण्यासाठी दूरवरून लोक येत असतात. अर्थात याची बाहेर देखील निर्यात हेात असते. त्‍या अनुषंगाने जळगाव बाजार समितीमध्ये (Jalgaon Market Committee) मेहरूणी बोरांची तुलनेत सर्वाधिक आवक होते. बाजार समितीमधील दोन अडतदारांकडे अधिक आवक होते. कारण शेतकऱ्यांकडे तशी आगाऊ नोंदणी केलेली असते.

प्रतिकिलो २० ते २५ रूपये दर

यंदा बोरांची आवक तशी कमी आहे. तरी देखील प्रतिदिन सरासरी बारा क्विंटल आवक झाली. किमान २० ते २५ रुपये प्रतिकिलोचा दर मेहरूणी बोरांना यंदा मिळाला. मागील वर्षीदेखील डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक टिकून होती. काही शेतकरी जळगाव शहरात बोरांची हातविक्री करतात. त्यांना प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दर सध्या मिळत आहेत.

बोरांचे ग्राहक

काही शेतकरी दररोज १० ते १५ किलो बोरे घेऊन जळगाव शहरात व उपनगरांत हातविक्री करतात. त्यास प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दर मिळत आहे. मोठ्या आकाराच्या संकरीत बोरांच्या तुलनेत मेहरुणी बोरांचे ग्राहक जळगाव, धुळे भागात अधिक आहेत. ज्यांचा नातेवाइक, व्यवसाय, नोकरी आदी कारणांनी जळगाव शहराशी संपर्क असतो. काही जळगावकर मंडळी आपल्या नातेवाइकांना पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई, बंगळुरू, नागपूर आदी भागांत पाठविण्यासाठी ही बोरे आवर्जून घेतात. त्यामुळेच बाजार समिती किंवा किरकोळ बाजारात त्यांना चांगला उठाव आहे आणि दरही टिकून असतो. जानेवारीच्या मध्यानंतर आवक कमी होईल. वीस जानेवारीच्या आसपास हंगाम संपेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com