Corona Saam tv
महाराष्ट्र

Dhule: कोरोनाचे ‘माईल्ड’ २२ रूग्ण सक्रिय

कोरोनाचे ‘माईल्ड’ २२ रूग्ण सक्रिय

साम टिव्ही ब्युरो

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत असून १ ते २७ जून या कालावधीत ६४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पैकी २२ रुग्ण सध्या सक्रिय आहेत. ते माईल्ड स्वरुपातील आहेत. या स्थितीत आरोग्य यंत्रणांनी (Dhule News) दक्षता बाळगणे आवश्यक आहे. आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयासह सर्व शासकीय रुग्णालयांमधील (Hospital) चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. (dhule news Corona Mild 22 active patients in district)

कोरोना (Corona) विषाणूची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहात चाचण्यांची संख्या वाढवावी. कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचीही चाचणी करावी. लसीकरण वाढवावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिले. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात मंगळवारी (ता. २८) दुपारी आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

शर्मा यांचे आवाहन, सूचना

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, ऑक्सिजन प्रकल्प तत्काळ कार्यान्वित होतील, असे नियोजन करावे. तसेच ऑक्सिजनचा पुरेसा साठा राहील याचीही दक्षता घ्यावी. कोरोना रोखण्यासाठी लसीकरणावर भर द्यावा. प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्याचे नियोजन करावे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषधे, साधनसामग्रीची उपलब्धता करून ठेवावी. संबंधित २२ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. नागरिकांनीही दक्षता बाळगली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त बाळगावी. मास्कचा वापर करावा. कोरोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

धुळे शहरात सर्वाधिक रूग्ण

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे यांनी सांगितले, जिल्ह्यात कोविडचे २२ रुग्ण आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. जूनमध्ये आतापर्यंत एकूण ६४ रुग्ण आढळले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर २.२ असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के आहे. या २२ रुग्णांपैकी धुळे शहरात १६, शिरपूरला दोन, तर साक्री तालुक्यात चार सक्रिय रुग्ण आहेत. तसेच हिरे मेडिकलचा विद्यार्थीही दोन दिवसांपूर्वी बाधित झाला आहे. यात अधिकतर रुग्णांना ‘माईल्ड’ स्वरूपाची लागण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT