Ajit Pawar Death: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Sunil Tatkare On Ajit Pawar: अजित पवार यांचे विमान बारामतीमध्ये कोसळले होते. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केले. या विमान अपघातानंतर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, 'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की याची सखोल चौकशी केली जावी. ज्यावेळी अशाप्रकारे विमान अपघात होतात त्यावेळी देशात स्वतंत्र यंत्रणा भारत सरकारने स्थापन केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत चौकशी करावी अशी भूमिका मी मांडली. आमची पहिल्या दिवसांपासून मागणी आहे की याची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी देखील केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवत चौकशीची मागणी केली. मी जाहिररित्या मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी केली आहे की जे अशाप्रकारे भूमिका मांडतात, त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांचे जे काही मत आहे ते समजून घेतले पाहिजे त्यादिशेने देखील तपास केला पाहिजे. ज्यावेळी हा प्रकरणाचा तपास पूर्ण होईल तेव्हा फक्त राज्यातील जनतेपूरते सीमित न ठेवता देशातील जनतेला देखील कळाले पाहिजे. दादांच्या अपघाताच्या शोककळा संपूर्ण देशाने अनुभवली आहे. जबरदस्त ताकदवान नेता आपल्यातून गेला यामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे याची माहिती देशभरातील जनतेला कळाली पाहिजे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com