Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : अनिल गोटेंचा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला; फारूक शहा यांचा अर्ज वैध

Dhule news : धुळे शहर मतदारसंघातुन ठाकरे गटाकडून माजी आमदार अनिल गोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर एमआयएम कडून विद्यमान आमदार फारूक शहा यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला

भूषण अहिरे

धुळे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज काल दाखल झाल्यानंतर आज सर्व उमेदवारी अर्जांवर छाननी प्रक्रिया पार पडली. या दरम्यान एमआयएम पक्षाचे आमदार फारुक शहा यांच्या उमेदवारी अर्जावर ठाकरेगट शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे यांनी आक्षेप घेतलेला होता. मात्र गोटे यांचा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला असून फारुक शहा यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. 

धुळे (Dhule News) शहर मतदारसंघातुन ठाकरे गटाकडून माजी आमदार अनिल गोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर एमआयएम कडून विद्यमान आमदार फारूक शहा यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान गोटे यांनी शहा यांच्या अर्जावर घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे फेटाळून लावण्यात आला असून, (MIM) एमआयएम पक्षाचे आमदार फारुक शहा यांनी अनिल गोटे यांच्या आक्षेपावर टीका केली आहे. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी धुळे शहरातील २५ उमेदवारांपैकी फक्त माझ्याच उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला असल्याचा आरोप देखील फारूक शहा यांनी गोटे यांच्यावर केला आहे.

गोटेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट 
धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार (Anil Gote) अनिल गोटे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भेटायला या असं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार त्यांची भेट घेतली असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील हे ठाकरे गट शिवसेनेचे धुळे शहर विधानसभेचे उमेदवार अनिल गोटे यांना साथ देणार का? हे बघणं अवचित्याच ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT