Anil Gote Saam tv
महाराष्ट्र

Anil Gote News : मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नावर ठोकलेला अंतिम खिळा; नार्वेकरांच्या निकालानंतर अनिल गोटे यांचा अजित पवारांवर निशाणा

Dhule News : सहा महिन्यांपूर्वी मी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरण्याचा आनंद असल्याची देखील भावना गोटे यांनी व्यक्त केली आहे,

भूषण अहिरे

धुळे : आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल म्हणजे भविष्यात अजित पवार यांना मुख्यमंत्री (Ajit Pawar) पदाच्या स्वप्नावर ठोकलेला अंतिम खिळा आहे; असा खोचक टोला (Dhule) धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून लगावला आहे. (Breaking Marathi News)

विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल कितीही विवादास्पद असला तरी सुध्दा महाराष्ट्राच्या राजकारणांवर दिर्घकाळ परिणाम करणारा तसेच मराठा समाजाचे खच्चीकरण करणारा ठरेल. भाजप संदर्भात बोलताना 'धरल तर चावत आणि सोडल तर पळत.' अशी अवस्था भाजप प्रवेशीत (Eknath Shinde) एकनाथ शिंदे व अजित पवार यांची झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे पद जाईल व नंतरचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार होतील, यासाठी पाण्यात देव बुडवून बसलेल्यांच्या देवांच्या नाका-तोंडात पाणी गेले आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपमध्ये कसे नेते हे अजितदादांना कळेल 

अजित दादांना आता कळेल की, भारतीय जनता पक्षात किती कपटी, कारस्थानी व केसाने गळा कापणारे हृदय शून्य नेते बसले आहेत; अशी भावना देखील गोटे यांनी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर सहा महिन्यांपूर्वी मी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरण्याचा आनंद असल्याची देखील भावना गोटे यांनी व्यक्त केली आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT