Accident
Accident Saam tv
महाराष्ट्र

रस्‍ता ओलांडताना कंटेनरची धडक; एकाचा मृत्‍यू, अपघातानंतर महामार्गावर रास्ता रोको

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सांगवीजवळ (ता. शिरपूर) अपघातांची मालिका बुधवारी (ता.22) देखील सुरु राहिली. सकाळी रस्ता ओलांडतांना कंटेनरने धडक देऊन झालेल्या अपघातात (Accident) एकजण ठार झाला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको केला. तासभर सुरु असलेल्या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्‍या. (dhule news accident Death block the road on the highway after the accident)

सांगवी गावाकडून महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असतांना पठाण जमरे (वय 45, रा.वडगाव जि. बडवानी, मध्यप्रदेश) याला कंटेनरने धडक दिली. यात तो जागीच ठार (Death) झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थ महामार्गावर जमले. त्यांनी महामार्गाच्या दुतर्फा रास्ता रोको करुन वाहतूक रोखून धरली. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय (Police) पोलिस अधिकारी अनिल माने, सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट घटनास्थळी पोहचले. त्यांनी समजूत घातल्यानंतर एका बाजूची वाहतूक ग्रामस्थांनी खुली केली.

गतिरोधक टाकल्‍यानंतर आंदोलन मागे

महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला असून मोठे गतिरोधक टाकल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही; असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी धुळे- पळासनेर टोलवे लि.च्या अधिकार्‍यांशी तातडीने संपर्क साधला. काही वेळानंतर कंपनीतर्फे साहित्याने भरलेली वाहने महामार्गावर दाखल झाली. गतिरोधक टाकल्यानंतर जमाव गावात परतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT