धुळे : धुळे मनपा हद्दीत अनेक वर्षांपासून विकास कामे रखडलेली आहेत. निधीअभावी ही कामे होत नव्हती. परंतु, रखडलेल्या विकास कामांसाठी (Dhule) धुळे मनपाला तब्बल ६० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे विकास कामे आता मार्गी लागणार आहेत. (Live marathi News)
धुळे महापालिका (Dhule Corporation) हद्दीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून निधी अभावी विकास कामे रखडून पडलेली होती. याचा परिणाम नागरिकांच्या रोशाला महानगरपालिका प्रशासन त्याचबरोबर लोकप्रतिनिधींना देखील सामोरे जावे लागत होते. परंतु, आता धुळे महापालिका हद्दीमधील 41 विकास कामांसाठी जवळपास 60 कोटी रुपयांचा निधी प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता धुळे महानगरपालिका हद्दीतील रखडलेल्या विकास कामांना गती मिळणार आहे.
या कामांना प्राधान्य
धुळे शहरातील रस्त्यांची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तसेच शहरातून भूमी अंतर्गत गटारीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. तसेच शहरातील सुशोभीकरण करण्यासाठी देखील हा निधी वापरण्यात येणार असल्यामुळे धुळे महापालिका हद्दीतील बहुतांश समस्या पालिका प्रशासनाला दूर करता येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.