Manasvi Choudhary
शरीरात हाडे ठिसूळ होण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियमची कमतरता.
शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे दुखी, सांधेदुखी यासारंखे आजार डोकं वर काढतात.
शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी अनेकजण गोळ्या खातात, पण तुम्हाला माहितीये का? पावसाळ्यात मिळणारी ही एक हिरवी भाजी शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवते.
अळूच्या देठांची भाजी ही कॅल्शियमच्या कमतरतेवर गुणकारी मानली जाते. अळूच्या देठांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. ही भाजी आठवड्यातून दोनदा खाल्ल्याने हाडांना ताकद मिळते.
अळूच्या देठांमध्ये नैसर्गिक अँटी-इफ्लेमेटरी गुणधर्म सांध्यांमधील सूज कमी करतात ज्यामुळे गुडघा दुखी आणि पायांची बोटे दुखणे कमी होते.
अळू्च्या देठांची भाजीचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते ज्यामुळे शरीरातला थकवा कमी होण्यास मदत होते.
अळूच्या देठांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही आणि पोट साफ राहण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.