Crime: पत्नीने गळा आवळून नवऱ्याचे संपविले जीवन

पत्नीने गळा आवळून नवऱ्याचे संपविले जीवन; बीड जिल्‍ह्यातील धक्कादायक घटना
Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv
Published On

बीड : दारू पिऊन आलेल्या नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना बीडच्या (Beed) गोवर्धन हिवरा गावामध्ये उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेवराईची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा परळीत (Parali) त्याच प्रकारे घटना घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Tajya Batmya)

Beed Crime News
Accident News: साखरपुडा आटोपून घरी जाताना अपघात; दोन वाहनांच्‍या धडकेत १५ जखमी

हनुमान उर्फ राजाभाऊ अशोक काकडे (वय 30 रा. गोवर्धन हिवरा ता. परळी) असे मृत पतीचे नाव आहे. तर वैष्णवी काकडे असे आरोपी पत्नीचे नाव आहे. सिरसाळा पोलीस (Police) ठाण्यातील कर्मचारी बुरान नसीर शेख यांच्या फिर्यादीवरून 11 नोव्हेंबरला रात्री हनुमान दारू पिऊन घरी आला. यानंतर पत्नी वैष्णवी हिच्यासोबत त्याचे जोराचे (Crime News) भांडण झाले. त्यानंतर वैष्णवीने खोलीचा दरवाजा लावून त्याचे आयुष्य संपवले आणि त्यानेच गळफास घेतल्याचा कांगावा केला.

आत्‍महत्‍या केल्‍याची दिली खबर

पतीचा खून केल्यानंतर वैष्णवीने सुताची दोरी छताच्या आडूला अडकवली. त्यानंतर दरवाजा उघडून हनुमानने दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कांगावा करत सिरसाळा पोलिसांना तशी खबर दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हनुमान पलंगावर उताण्या स्थितीत पडल्याची दिसून आले. इतर नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी हनुमानला प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले असता तिथून त्यास परळी येथे हलवण्यात आले. परंतु शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी हनुमानला तपासून मयत घोषित केले.

पत्‍नी पोलिसांच्‍या ताब्‍यात

दरम्यान परळीच्या रुग्णालयात हनुमानच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यातून गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या अभिप्रायानंतर सिरसाळा पोलिसांनी पत्नी वैष्णवी हिच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करून तिला ताब्यात घेतले आहे. दरम्यान गेल्या 7 दिवसात विविध दोन ठिकाणी पत्नीने आपल्या पतीचा खून करून काटा काढल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com