धुळे महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीत संभ्रम
भाजप–शिवसेना यांच्यात जागावाटपावरून मतभेद
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या बैठकीनंतरही निर्णय प्रलंबित
१५ जानेवारीला ७४ जागांसाठी मतदान
राज्यभर लक्ष महानगरपालिका निवडणुकांकडे
भूषण अहिरे, धुळे
राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संथांच्या निवडणुका पार पडल्या असून आता जनतेचं लक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे लागलं आहे. काही ठिकाणी पक्षापक्षांमध्ये युती होताना पाहायला मिळते आहे. तर काही ठिकाणी जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळते आहे. धुळे महानगरपालिका निवडणूकीत जागा वाटपाचा तिढा सुटावा यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली महायुती मधील भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
येत्या १५ जानेवारी रोजी महापालिकेच्या निवडणूका होणार असून 74 जगांसाठी धुळे महापालिकेची निवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने ५५ प्लसचा नारा देण्यात आला आहे. तर शिंदे सेना २१ जागेवर ठाम आहे. सन्मानपुर्वक जागा मिळाल्यातरच महापालिका निवडणुकीत युती होईल अन्यथा स्वतंत्र लढण्याचा इशारा शिवसेनेच्या आमदारांच्या वतीने यापूर्वी देण्यात आला होता.
वरीष्ट पातळीवरुन दोनही पक्षांना युतीबाबत निरोप देण्यात आला आहे. युतीबाबत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा देखील झाली होती. मात्र पुढील निर्णय पालकमंत्री घेतील, अशी भूमिका भाजपने घेतली असल्यामुळे धुळ्यातील महायुतीचा तिढा सुटलेला नाही.
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भाजप आणि शिवसेना नेत्यांसोबत बैठक करत तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळे महायुती एकत्रित लढतील की आमने सामने रिंगणात उतरतील हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान राज्यभरात आता सगळ्यांचे लक्ष पालिका निवडणुकीकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.