Dhule News Saam tv
महाराष्ट्र

सीआयडी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याची लूट; पाच चोरटे ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : सीआयडी असल्याची बतावणी करत लूट करणाऱ्या पाच जणांच्या शिरपूर तालुका पोलिसांनी 24 तासाच्या आत मुसक्या आवळत चोरीचा छडा लावला आहे. (dhule crime news Robbery of a trader pretending to be a CID)

शिरपूर (Shirpur) तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उमरगा या ठिकाणी आपण सीआयडी असल्याची बतावणी करत चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरी रात्री दहा वाजता जाऊन कुटुंबीयांना कारवाईची धमकी देत लूट केल्याची घटना (Dhule News) उघडकीस आली होती. त्या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस (Police) ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलिसांनी नाकाबंदी करत सात पैकी पाच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दोन चोरट पसार

कारवाईदरम्यान चोरट्यांनी नेलेला मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. यापैकी आणखी दोन चोरटे पसार असून त्यांच्यासाठी एक पथक तैनात करण्यात आले असून ते देखील काही दिवसात गजाआड असतील; असा विश्वास पोलीस प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. या कारवाई संदर्भात पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाई संदर्भातील माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT