Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime News: दहा तोळ्याहून अधिकचे सोने केले लंपास; परिवार बाजारात गेल्याची साधली संधी

Dhule News दहा तोळ्याहून अधिकचे सोने केले लंपास; परिवार बाजारात गेल्याची साधली संधी

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीवर चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रात्री देखील जवळपास आठ ते दहा वाजेच्या दरम्यान धुळे (Dhule) शहरापासून काही अंतरावर असलेल्या नकाने रोड परिसरातील श्रीनाथनगर येथे घरफोडी झाली. यात (Theft) चोरट्यांनी दहा तोळ्याहून अधिकचे सोने लंपास केले आहे. (Maharashtra News)

धुळे शहरातील श्रीनाथनगर परिसरात हि घटना घडली. घरमालक कुटुंबीयांसह बाजारामध्ये खरेदीसाठी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी संधीचा फायदा उचलत त्यांच्या बंद घरात कडीकोंडा व कुलूप तोडून (Crime News) आत प्रवेश केला. जवळपास दहाहून अधिक तोळे सोने या चोरट्यांनी घरातून लंपास केले आहे. परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित घरमालकास फोन करून त्यांच्या घरात कोणी अज्ञात चोरटे घुसले असल्याचे फोनवरून सांगितले. 

दरम्यान परिसरातील नागरिकांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. यावेळी शेजारच्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न परिसरातील नागरिकांच्या हाती देखील लागला. परंतु त्या चोरट्याने मोठ्या हात झटकून त्या ठिकाणाहून पोबारा केला आहे. यादरम्यान त्यांनी चोरी केलेले जवळपास १४ ते साडे चौदा तोळे सोने हे परिसरातच पडले. परिसरातील नागरिकांनी ते उचलून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. परंतु अद्यापही दहा तोळ्याहून अधिकच सोन या चोरट्यांनी लंपास केले असल्यामुळे पश्चिम देवपूर पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : पुणे जिल्ह्यात दुखावटा जाहीर

Famous Actress : सिनेसृष्टी हादरली! घरगुती वाद टोकाला गेला; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्यावर नातवाईकांनीच केला चाकू हल्ला, नेमकं घडलं काय?

Skin Care : चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाचा 'हा' १ उपाय ठरेल सगळ्यात बेस्ट

Maharashtra Live News Update: मावळ तालुक्याच्या माजी आमदार रूपरेखा ढोरे यांचं निधन

Ajit Pawar Plane Accident Place: अजित पवारांचा अपघात झाला ते ठिकाण कुठं आहे?

SCROLL FOR NEXT