Dhule News : कांदा निर्यात धोरणाविरुद्ध महाविकास आघाडीचा रास्ता रोको; केंद्र सरकारचा निषेध

कांदा निर्यात धोरणाविरुद्ध महाविकास आघाडीचा रास्ता रोको; केंद्र सरकारचा निषेध
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणा विरोधामध्ये महाविकास आघाडीचे तीनही पक्ष आक्रमक झाले. आज (Dhule) धुळे- सुरत महामार्गावरील शेवाळी फाटा या ठिकाणी या सर्व महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. (Tajya Batmya)

Dhule News
Leptospirosis Patient : जळगाव जिल्ह्यात आढळला ‘लेप्टोस्पायरोसिस’चा रुग्ण; आरोग्य पथकाकडून पाहणी

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेला ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात यावा; अशी मागणी या रास्ता रोको करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी (Farmer) केली आहे. रस्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी देखील सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले. यावेळी महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचा आरोप देखील लावला आहे.

Dhule News
Dombivali Crime News: रमी सर्कलवर गेम खेळून झाला कर्जबाजारी; कर्ज फेडण्यासाठी केली चोरी, मात्र धाडसी तरुणामुळे पकडला गेला

महामार्गावर वाहतूक कोंडी 

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणा विरोधामध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली. आंदोलकांनी रास्ता अडवून धरल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचे बघावयास मिळाले. वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील यावेळी लागल्याच्या बघावयास मिळाल्या आहेत,

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com