Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: व्यवसायानिमित्त आलेल्या साताऱ्याच्या तरुणाचा खून

व्यवसायानिमित्त आलेल्या साताऱ्याच्या तरुणाचा खून

साम टिव्ही ब्युरो

धुळे : रतनपुरा बोरकुंड (ता. धुळे) शिवारात व्यवसायानिमित्त आलेल्या साताऱ्याच्या तरुणाचा हत्याराच्या सहाय्याने निर्घृण खून (Crime News) झाल्याची खळबळजनक घटना रविवारी समोर आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत (Dhule News) धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. (Letest Marathi News)

शेरेशिंदेवाडी (जि. सातारा) येथील आदर्श दत्तात्रय पिसाळ (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या गावातील आणखी एक जण शेती सपाटीकरण करण्याच्या व्यवसायानिमित्त रतनपुरा येथे आले होते. रविवारी सकाळी गाव शिवारातील शेतात उभ्या ट्रॅक्टरजवळ आदर्श पिसाळ हा मृतावस्थेत आढळून आला. शनिवारी (ता.११) सायंकाळी शेतातून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी तो झोपलेला असावा असे समजून लक्ष दिले नाही.

शंका आल्‍याने झाला उलगडा

मात्र, सकाळी शंका आल्याने जवळ जाऊन पाहिले त्यावेळी आदर्श याच्या चेहऱ्यावर गंभीररीत्या मारून त्याचा कोणीतरी खून केल्याचे दिसून आले. त्यानंतर गावात खळबळ उडाली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सागर काळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, तरुणाच्या खुनाचे कारण गुलदस्त्यात असून पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT