Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : बसमधून उतरताच घेरले; गोळीबार करत व्यापाऱ्याकडील कोट्यवधींचे सोने लांबवीले, भरचौकातील घटनेने धुळ्यात खळबळ

Dhule news : गोळीबार करत व्यापाऱ्याला भर चौकात लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. संबंधित सराफ व्यापारी शहाद्याहून एसटी बसने धुळ्यात आले होते. सावरकर चौकातील बस थांब्यावर उतरताच चोरटयांनी डाव साधला

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीच्या सावरकर चौकात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका सोनं व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत व्यापाऱ्याकडील सुमारे तीन किलो वजनाची सोन्याची बॅग हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

धुळे शहरात मागील काही दिवसांपूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. तसेच पायी जाणाऱ्याला लिफ्ट देऊन त्याला लुबाडण्याचा आल्याची घटना देखील घडली आहे. यानंतर पुन्हा एकदा गोळीबार करत व्यापाऱ्याला भर चौकात लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. संबंधित सराफ व्यापारी शहाद्याहून एसटी बसने धुळ्यात आले होते. सावरकर चौकातील बस थांब्यावर उतरताच चोरटयांनी डाव साधला. 

बसमधून उतरताच व्यापाऱ्याला घेरले 

सराफ व्यापारी बसमधून उतरताच मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी त्यांना घेरले. काही कळण्याच्या आतच त्यांनी हवेत दोन राऊंड फायर केले. यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला होता. याच गोंधळाचा फायदा घेत दरोडेखोरांनी व्यापाऱ्याच्या हातात असलेली सोन्याची बॅग हिसकावली आणि पसार झाले. दरोडेखोरांनी व्यापाऱ्यावर आधीच पाळत ठेवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.  

पोलिसांकडून तपास सुरु 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अद्याप या घटनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लुटलेल्या सोन्याचे वजन अंदाजे तीन किलो असण्याची शक्यता असून त्याची किंमत कोट्यवधींमध्ये मानली जात आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

SCROLL FOR NEXT