Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : शेतमजुरीच्या वादातून भयानक कृत्य; धुळ्यातील हत्येचा उलगडा, चार आरोपी ताब्यात

Dhule News : धुळे जिल्ह्यातील थाळनेर परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मात्र मृत इसमाजाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते

भूषण अहिरे

धुळे : शेतात कामाला गेल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून मजुरी मागण्यासाठी गेले असताना यातून वाद निर्माण झाला. या वादातून चार जणांनी मिळून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना थाळनेर शिवारातील गरताड परिसरात घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत हत्येचा उलगडा केला असून या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले आहे. 

धुळे जिल्ह्यातील थाळनेर शिवारातील गरताड परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मात्र मृत इसमाजाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तसेच खुनाचे कारण शोधणे देखील आव्हान होते. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत या इसमाच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

मजुरीच्या पैशांवरून वाद 

दरम्यान पोलिसांनी तपास केला असता शेती मजुरीतील वादावरून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. मजुरी करणाऱ्या विधी संघर्षित बालकासोबत संबंधित मृत इसमाचे भांडण झाले होते. याच भांडणाच्या कारणातून विधी संघर्षित बालकाने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने संबंधित इसमाचा गळा आवळून खून केल्याची बाब पोलीस तपासात उघडकी झाली आहे. 

चारही मारेकरी पोलिसांच्या ताब्यात 
अखेर पोलिसांनी सखोल तपास करत चारही मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील तिघा मारेकऱ्यांना थाळनेर येथुन ताब्यात घेण्यात आले आहे. तर एका मारेकऱ्यास पोलिसांनी मध्य प्रदेश येथून त्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stampede In Rally: अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, १० जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

शेतकरी पाण्यात, सत्ताधारी नाचगाण्यात, शिंदेसेनेच्या नेत्याचा असंवेदनशीलतेचा कळस

Sadabhau Khot: चमकोगिरीविरोधात शेतकऱ्यांचा संताप,सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांचा घेराव

Maharashtra Live News Update: वादळाच्या पार्श्वभुमीवर मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या बंदर विभागाच्या सुचना

कृषी मंत्री दत्तात्रय भरणें समोर शेतकऱ्याला हुंदका आला दाटून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT