Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : स्वस्तात तांब्याची वायर देण्याच्या बहाण्याने लूट; टोळी निजामपूर पोलिसांच्या ताब्यात

Dhule News : ४४ टन कॉपर वायर २ कोटी ४४ लाख रुपयांत देण्याचे निश्चित झाले. त्यासाठी चोरट्यांनी २२ ते २३ लाखांची आगाऊ रक्कमेची मागणी केली

भूषण अहिरे

धुळे : मुंबईतील एका पार्टीला स्वस्तातील तांब्याची वायर देण्याचे आमिष दाखवून त्यांची लुटमार करण्यात आली होती. लूटमार करणाऱ्या या टोळीला अवघ्या १२ तासात जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे. टोळीतील तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १३ लाख ५० हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. 

मुंबईतील (Mumbai) इंजिनिअरींग वर्कशॉचे मॅनेजर सर्वेश सोनाळकर यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधत आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाची तांब्याची वायर असून आम्ही ती तुम्हाला निम्मे किमतीत देवू; असे आमिष संबंधित संशयितांनी दाखविले. त्यानुसार ४४ टन कॉपर वायर २ कोटी ४४ लाख रुपयांत देण्याचे निश्चित झाले. त्यासाठी चोरट्यांनी २२ ते २३ लाखांची आगाऊ रक्कमेची मागणी केली.

त्यानुसार मुंबईतील इंजिनिअरींग वर्कशॉपचे मालक व त्यांचे काही सहकारी हे दोन चारचाकी वाहनांनी पेटले गाव शिवारातील (Dhule) सुझलॉन कंपनीजवळ आले. कंपनीच्या गेटवर हे ठग अगोदरच उभे होते. त्यांनी या संबंधितांकडून त्यांच्या ताब्यातून २२ लाख ३ हजारांची रोकड, २ लाख ५५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व चैन, घड्याळ, एटीएम कार्ड असा जवळपास २४ लाख २८ जहारांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला होता. या प्रकरणी (Police) पोलिसात तक्रार दिल्यानंतर अवघ्या चोवीस तासात या टोळीला निजामपूर पोलिसांनि ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT