Dhule Corporation 
महाराष्ट्र

त्‍या ४७ भाजप नगरसेवकांना तुरूंगात धाडणार; शिवसेनेचा इशारा

धुळ्यातही ४७ भाजप नगरसेवक जातील तुरूंगात; शिवसेनेचा इशारा

भूषण अहिरे

धुळे : जळगाव महापालिकेत ज्‍या प्रमाणे नगरसेवक तुरूंगात गेले होते. त्‍यानुसार धुळ्यात देखील सत्ताधारी पक्षाचे ५२ पैकी ४७ नगरसेवक भ्रष्टाचारामुळे तुरुंगात जातील. असा इशारा शिवसेनेने सत्ताधारी भाजपला दिला आहे. (dhule-corporation-news-Shiv-Sena's-press-and-warning-47-BJP-corporators-to-be-jailed)

धुळे महापालिकेवर भाजपची एक हाती सत्ता असून धुळे महापालिकेचा कारभार हा अत्यंत चुकीच्या मार्गाने सुरू असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे. तसेच धुळे महापालिकेमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याच म्हणत जळगावप्रमाणे धुळ्यात देखील सत्ताधारी पक्षाचे ५२ पैकी ४७ नगरसेवक हे भ्रष्टाचारामुळे तुरुंगात जातील. ते काम शिवसेनेच्या माध्यमातूनच मार्गी लागेल असे देखील वक्तव्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

धुळेकरांचे स्वप्न भंग

महापौर म्हणजे लबडांच्या टोळीचे सरदार असे म्हणत भाजपतर्फे गेल्या अडीच वर्षात कुठल्याही प्रकारच्या विकास कामांना सुरुवात केली नाही. त्याचबरोबर धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता येण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हाती सत्ता मागत धुळ्याचा विकास करण्याचे खोटे स्वप्न धुळेकरांना दाखविले होते. परंतु भाजपने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर धुलेकरांचे स्वप्न भंग केल्याचा आरोप लावत धुळ्यातील रस्त्यांची गेल्या कित्येक महिन्यांपासून दुरावस्था असताना शिवसेनेने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून २३.३ कोटींचा विकास निधी आणून धुळेकरांना दिलासा दिला असल्याचे देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Padwa: दिवाळीचा आजचा दिवस सोन्यासारखा! पाडव्याच्या मुहूर्तावर या राशींना मिळणार भाग्याची साथ

Thane Tourism : शहराच्या गोंगाटापासून दूर निवांत ठिकाणी घालवा येणारा वीकेंड, बेस्ट लोकेशन आताच नोट करा

HBD Parineeti Chopra : राघव चड्ढाची 'परी' किती कोटींची मालकीण? आकडा वाचून डोळे फिरतील

Jio Recharge Offer: जिओचा नवीन पोस्टपेड प्लॅन धमाका! फक्त 'या' किमतीत ७५ जीबी डेटासह मिळवा प्रीमियम सुविधा

Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

SCROLL FOR NEXT