Dhule corporation 
महाराष्ट्र

सभा सुरू असताना सभागृहात आणून टाकला कचरा; धुळे मनपात विरोधकांची घोषणाबाजी

सभा सुरू असताना सभागृहात आणून टाकला कचरा; धुळे मनपात विरोधकांची घोषणाबाजी

भूषण अहिरे

धुळे : धुळे मनपाच्या स्थायी सभेमध्ये कचऱ्याचा विषय चांगलाच गाजला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी कचऱ्याने भरलेल्या पिशव्या आणून बॅनर झळकवत मनपा प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. (dhule-corporation-Garbage-brought-into-the-hall-during-the-meeting-protesters-shouting)

धुळे महानगरपालिकेमध्ये आज स्थायी समितीची बैठक कचऱ्याच्या मुद्यावरून चांगलीच गाजली. बैठकीत विरोधकांनी कचऱ्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शहरात सर्वत्र कचरा पसरलेला असताना स्‍वच्‍छता होत नाही. यामुळे नागरीकांचे आरोग्‍य देखील धोक्‍यात असल्‍याचा मुद्दा विरोधकांनी मांडला. यानंतर विरोधतांची चक्‍क कचराच मनपा सभागृहात टाकत निषेध नोंदविला.

सत्‍ताधारी भाजपवर नाराजी

धुळे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता असून समाजवादी पार्टीच्या अमीन पटेल त्याचबरोबर विरोधीपक्षनेते यांनी थेट महापालिकेच्या महासभेतच कचऱ्याने भरलेल्या गोण्या आणून सभेचे लक्ष वेधले. त्यामुळे आजची सभा कचऱ्याच्या मुद्यावरून चांगलीच गाजली. शहरात तीन ते चार दिवस कचरा तसाच पडून असल्याने पालिका प्रशासन नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकत असल्याचा आरोप यावेळी निषेध विरोधकांनी लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

Pune BJP : भाजपचा स्थापना दिवस अन् अनधिकृत फ्लेक्सची बजबजपुरी, पुणे महापालिका कारवाई करणार?

Kalyan Tourism : कल्ला मस्ती ऑन द वे! वीकेंडला फिरा 'कल्याण'जवळील 'हे' पिकनिक स्पॉट्स, प्लान करा Summer ट्रिप

राजकारणात बदलाचे संकेत! २८८ नव्हे तर असतील ३५० आमदार; ५४४ ऐवजी असणार ६५० खासदार,MP, MLAची संख्या वाढणार?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील भोंदू अशोक खरात यांच्या कार्यालयात पुन्हा एसआयटीच पथक दाखल

SCROLL FOR NEXT