अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय. राम मंदिर चोरी प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपविरोधात टीकेची झोड उठवलीये. अशातच आता राम मंदिर चोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी खळबळजनक आरोप केलाय. राम मंदिरातील चोरीचा पैसा भाजपनं पक्षफोडीसाठी वापरल्याचा दावा ठाकरेंनी केलाय. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर पलटवार करताना भाजपनं पक्षफुटीवरून ठाकरेसेनेला खोचक टोला लगावलाय.
राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेसेनेनं भाजपला खिंडीत गाठण्याची रणनीती आखलीय. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी आता थेट रामरक्षा आंदोलन सुरू करण्याची घोषणा केलीय. येत्या रविवारी ठाकरेसेनेकडून राज्यभरात 'रामरक्षा' आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र या आंदोलनाची शिंदेसेनेनं खिल्ली उडवलीये..
पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे राम मंदिरावरून उत्तरप्रदेशात जोरदार राजकारण पेटलंय. मात्र आता याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले असून उद्धव ठाकरेंना दीर्घ काळानंतर भाजपला कोंडीत पडकण्याची संधी आलीय. मात्र त्यांच्या या आंदोलनाला राज्यात कसा प्रतिसाद मिळणार आणि मविआतले मित्र पक्षही त्यांच्यासोबत उभे राहणार का? याची उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.