जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भावामुळे वर्षभरापासून शालेय शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. ऑनलाईन शिक्षणाचे धडे काही शाळांमध्ये गिरविले जात आहेत. मात्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ऑनलाईनचा पर्याय राबविण्यास अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. अशात जि.प.च्या अनेक शाळा बंद असताना, जळगाव तालुक्यातील सावखेडा खु. येथील शिक्षकांनी गावात ‘ओट्यावर शाळा’ हा अभिनव उपक्रम राबवून शिक्षणाचा नवा पर्याय उभा केला आहे. (jalgaon-news-savkheda-zp-school-Unique-school-filling-up-here-new-option-of-education)
वर्ष– दीड वर्षांपासून शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची प्रत्यक्ष संवाद राहिलेला नाही. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय देखील फारसा प्रभावी ठरत नाही. याकरीता शिक्षकांनी पर्याय निवडत ओट्यावर शाळा भरविली. यामुळे विद्यार्थी नेहमी शिक्षकांच्या देखरेखीत राहत असून, कोरोनाच्या काळात घराबाहेर देखील जात नाहीत आणि शिक्षणाला देखील कोणताही ‘ब्रेक’ देखील लागत नाही. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाला मुख्याध्यापक अरुण चौधरी, प्रवीण चौधरी व किरण सपकाळे या शिक्षकांनी चांगल्याप्रकारे राबवून इतर शाळांसाठी देखील नवा पर्याय उभा केला आहे. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची विद्यार्थी देखील मजा घेत आहेत.
रोज दहा वाजता दप्तरासह विद्यार्थी तयार
सावखेडा खु. जि. प. शाळेत एकूण तीन शिक्षक आहेत. गाव लहानसे व येथील नागरिकांचा व्यवसाय शेती व मजुरी हाच आहे. शहरापासून गाव दुर असल्याने इंटरनेटची समस्या देखील नेहमीच असते, अशा परिस्थितीत मोबाईलवर ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यास अनेक अडथळे येतात. त्यामुळे गावातील जि.प. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी सकाळी १० वाजता आपआपल्या घरातील ओट्यावर येवून दप्तर घेवून बसतात. तीन्ही शिक्षक दररोज जळगावहूनच प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठीचा दररोजचा अभ्यासक्रमाची झेरॉक्स काढून काही प्रश्नावली घेवून येतात. नंतर तीच प्रश्नावली गावातील प्रत्येक विद्यार्थ्याचा ओट्यापर्यंत पोहचवून विद्यार्थ्यांना दिली जाते. परत तासानंतर शिक्षक पुन्हा विद्यार्थ्यांकडे येतात. ओट्यावर बसून प्रत्येक विद्यार्थ्यांला भेटून त्याने सोडविलेले उत्तरे तपासून त्याने केलेल्या चुकांचे निरसन करत असतात.
ऑनलाईन नव्हे मात्र घरातच धडे
कोरोनाचा प्रादुर्भावामुळे विद्यार्थी घरातच थांबणे गरजेचे आहेत. जि.प. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी घरातच थांबून आपले शिक्षण देखील पुर्ण करत आहेत. विशेष म्हणजे पालक देखील घरीच थांबून शिक्षकांसोबत या उपक्रमात जुडून पाल्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. गावातील नागरिकांकडून देखील या उपक्रमाला सहकार्य मिळत असून, ग्राम पंचायत प्रशासन असो वा इतर संस्था देखील जि.प.शाळेच्या शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाला सहकार्य करत आहेत.
चार तास भरते ओट्यावरची शाळा
अनेक खासगी संस्था व इतर सरकारी शाळा देखील कोरोनाचे कारण देत वर्षभरापासून बंद असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण देखील थांबविले आहे. मात्र, सावखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाची चर्चा सावखेड्याचा पुर्ण पंचक्रोशीत होत आहेत. जि.प.शाळेतील शिक्षक एवढे प्रयत्न करत असताना, सावखेडा गावातील इतर उच्चशिक्षीत तरुण देखील या उपक्रमाशी जुडले असून, ओट्यावर जावून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ही ‘ओट्यावरची शाळा’ दररोज भरत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.