Dhule News  Saam TV
महाराष्ट्र

Dhule News : धुळे मध्यवर्ती बस स्थानकामध्ये कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर; नागरिकांकडून संताप व्यक्त

Dhule Bus Stand : धुळे-नाशिक बायपास बससाठी बुकिंग करणे आवश्यक असल्यामुळे प्रवाशी तिकीट बुकिंग कॅबिन बाहेर भर उन्हात रांगेत उभे होते. आता तिकीट मिळेल आणि बसमध्ये निवांत प्रवास

Ruchika Jadhav

भूषण अहिरे

Dhule Bus Stand :

धुळे मध्यवर्ती बस स्थानकामध्ये कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याची घटना समोर आली आहे. बस उपलब्ध असताना देखील बुकिंग इन्चार्ज तिकीट कॅबिन बंद करून तब्बल दीड ते दोन तास बाहेर निघून गेला. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

धुळे-नाशिक बायपास बससाठी बुकिंग करणे आवश्यक असल्यामुळे प्रवाशी तिकीट बुकिंग कॅबिन बाहेर भर उन्हात रांगेत उभे होते. आता तिकीट मिळेल आणि बसमध्ये निवांत प्रवास करता येईल या विचारात प्रवासी रांगेत उभे होते. तितक्यात बुकिंग इन्चार्ज बुकिंग कॅबिनला कुलूप लावून तेथून निघून गेला.

जाताना तिकीट केव्हा मिळले, किंवा काय झाले आहे याबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. जवळपास दिड ते दोन तास प्रवासी भर उन्हात कितीटासाठी ताटकळत उभे राहिले. दोन तास उलटूनही कर्मचारी न आल्याने प्रवाशांचा आणखी संताप झाला.

कॅबिन बाहेर थांबलेल्या प्रवाशांचा संताप अनावर झाला व त्यानंतर प्रवाशांनी या सर्व एसटी प्रशासनाच्या अनागोंदी कारभारा विरोधामध्ये संताप व्यक्त केला आहे. बस उपलब्ध असताना देखील बुकिंग इन्चार्ज कुठलेही कारण न सांगता बुकिंग कॅबिन बंद करून सर्रासपणे बाहेर निघून कसे काय जाऊ शकतात? असा संतप्त प्रश्न देखील यावेळी संतापलेल्या प्रवाशांनी विचारला आहे.

त्याचबरोबर एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा सर्व प्रकार वेळीच थांबवावा. तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी देखील संतप्त प्रवाशांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT