Dhule Accident News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident News: पायी जाणाऱ्या इंजिनीअर तरुणाला वाहनाची धडक; एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबाचा आक्रोश

पायी जात असलेल्‍या अभियंता तरुणाला वाहनाची धडक; एकुलता एक मुलगा गेल्याने कुटूंबाचा आक्रोश

साम टिव्ही ब्युरो

चिमठाणे (धुळे) : शेतात पायी जाताना भरधाव चारचाकी वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील अभियंता तरुण जागीच (Dhule News) ठार झाल्याची घटना चिमठाणे-साळवे कच्च्या रस्त्यावर घडली. तो एकुलता असल्याने चिमठाणे गावावर शोककळा पसरली आहे. शिंदखेडा (Shindkheda) पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Live Marathi News)

रविवारी दुपारी दीडच्या सुमारास चिमठाणे ते साळवे कच्च्या रस्त्यावर चारचाकी वाहन (एमएच १८, डब्ल्यू १२७३) प्रथमेश ऊर्फ पप्पू भीमराव अहिरे-धनगर (वय २३) चिमठाणे गावाकडून शेतात पायी जात असताना त्याला मागून जोराची (Accident) धडक दिली. यात त्याच्या छातीला, पोटाला व डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जमिनीवर पडला. यानंतर चारचाकी चालक वाहन सोडून पळून गेला.

त्यानंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेने चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन वाघ यांनी प्रथमेश यास तपासून मृत घोषित केले. प्रथमेशचे चुलत काका संतोष हिलाल धनगर-अहिरे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सदेसिंग चव्हाण तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान

सॉरी मम्मी - पप्पा! १०वीच्या विद्यार्थिनीनं किचनमध्ये आयुष्याचा दोर कापला, सुसाईड नोटमधून सांगितलं कारण

Pune : पोलीस ठाण्यात राडा! दारूच्या नशेत चालकाचा गोंधळ, पोलिसांना शिवीगाळ अन् मारहाण; फोन, लॅपटॉपही फोडले

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; राज्य कबड्डी असोसिएशन प्रशासक नियुक्तीला स्थगिती

Maharashtra Live News Update: अस्तंबा यात्रोत्सवावर ड्रोन कॅमेऱ्याची करडी नजर

SCROLL FOR NEXT