Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : कचरा संकलन करणाऱ्या गाडीने बालकास चिरडले; धुळे शहरातील धक्कादायक घटना

Dhule News : महापालिकेने कचरा संकलन करण्याचा ठेका दिला आहे. त्यानुसार शहरातील विविध भागात कचरा गाड्या या कचरा संकलित करण्यासाठी फिरत असतात

भूषण अहिरे

धुळे : धुळे महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्या शहरात सकाळच्या सुमारास फिरत असतात. दरम्यान सकाळी शहरातील गुणधर्म परिसरात कचरा संकलन करत असताना खेळत असलेल्या दिन वर्षाच्या बालकास चिरडल्याची घटना घडली आहे. यात बालकाचा मृत्यू झाला आहे. 

धुळे (Dhule News) शहरातील गुणधर्म परिसरात बर्फ कारखाना रस्त्यावर हि घटना सकाळच्या सुमारास घडली. शौर्या बडगुजर असे घटनेत मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. दरम्यान महापालिकेने कचरा संकलन करण्याचा ठेका दिला आहे. त्यानुसार शहरातील विविध भागात कचरा गाड्या या कचरा संकलित करण्यासाठी फिरत असतात.

आज सकाळी सदर गाडी शहरातील जुने धुळेतील गुणधर्म परिसरात बर्फ कारखाना रस्त्यावर आली असता, खेळत असलेल्या चिमुकल्याला जोरदार धडक (Accident) देत उडविले. यात मुलाला गंभीर दुखापत झाली होती. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी शौर्या यास लागलीच रुग्णालयात दाखल केले. मात्र या दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्या आई- वडिलांनी एकच आक्रोश केला.  

वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात 

घटनेनंतर परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. तर जुने धुळे परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या विरोधात रोष व्यक्त केला. दरम्यान पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetty : घोषणेप्रमाणे सर्व महिलांना लाभ मिळावा; लाडकी बहीण योजनेच्या नव्या निर्णयावरून राजू शेट्टी यांचा निशाणा

Manoj Jarange : फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भीत नाही; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम

Bhusawal News : विजेचा झटका लागून वायरमन खांबावरून कोसळला; दुरुस्तीचे काम करताना घडली दुर्घटना

Free Visa for Indian: भारतीयांना 'या' देशात मिळणार व्हिसा फ्रि एन्ट्री

Badlapur News: बदलापूरकरांचा जीवघेणा प्रवास, रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गाचा स्लॅब तुटला; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT