Viral Post: ट्रांस्परंट पाकिटात डिलिव्हर झाली 'ती' खाजगी वस्तू, ऑफइसमध्ये सर्वांसमोर व्हावे लागले लज्जीत

Viral Post News: सोशल मीडीयावर सध्या एका ऑनलाइन शॉपिंगचा व्यक्तीने अनुभव शेअर केलेला आहे. नक्की प्रकरण काय झाले ते तुम्ही पाहा.
Viral Post News
Viral PostSaam Tv
Published On

घरपोच ऑर्डर वितरीत करणाऱ्या कंपन्यांवर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू ऑनलाइन ऑर्डर करण्यास सुरुवात केली. पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका व्यक्तीने असा अनुभव शेअर केला आहे. त्यानंतर ऑफिसमध्ये किंवा कुठेही या गोष्टी ऑनलाइन ऑर्डर करताना यूजर्सही सावध राहतील.

कंपनीने आपली वैद्यकीय(Medical) उत्पादने वितरीत करण्यासाठी पारदर्शक फॉइलचा वापर कसा केला हे त्या व्यक्तीने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. रेडिट प्लॅटफॉर्मवर(Platform) वापरकर्त्याने लिहिले की स्विगी इंस्टामार्टने मला बरबाद केले आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये संपूर्ण प्रकराचा खुलासा केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण

सिंग यांनी रेडिटव वर लिहिले की Swiggy Instamart ने मला उद्ध्वस्त केले. कंडोम खरेदी करणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण मी ते सहसा ब्लिंकिट वरून ऑर्डर करतो. कारण ते एका जाड तपकिरी पॅकेटमध्ये, समंजस कंपनीप्रमाणे पाठवतात. यावेळी, मी ऑफिसमध्ये असताना स्विगी इंस्टामार्ट वापरून पाहण्याचा निर्णय घेतला. मला वाटलं तेसुद्धा त्याच प्रकारचे पॅकिंग वापरतील.

ऑर्डर आल्यावर, मूर्खाप्रमाणे मी ते रिसेप्शन डेस्कवर सोडण्यास सांगितले. पण मी ते उचलायला गेलो तर रिसेप्शनिस्टच्या समोरच पारदर्शक फॉइलमध्ये कंडोम ठेवलेले दिसले. आता, कदाचित संपूर्ण ऑफिस माझ्याबद्दल चुकीचा विचार करत असेल. या रेडिट पोस्टला 9.5 हजार अप्स मिळाले आहेत, तर शेकडो वापरकर्त्यांनी या पोस्टवर कमेंटही केल्या आहेत.

रेडिटवर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, इंटरनेट वापरकर्ते देखील वितरण कंपनी आणि ग्राहकांना तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की ऑफिसमध्ये हे सगळं कोण ऑर्डर करतं? दुसऱ्याने सांगितले की कार्यालयातील फ्रंट डेस्कवरील कर्मचाऱ्यांसह अशा गोष्टी ऑर्डर करताना पॉशदेखील लागू होऊ शकतो. डिलिव्हरी घेणाऱ्या व्यक्तीला ते घेणे सोयीचे नसेल तर तुम्हाला पॉश अंतर्गत नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते.

तिसऱ्या वापरकर्त्याने सांगितले की, हे सर्व कार्यालयात ऑर्डर करायचे की नाही हा चर्चेचा विषय आहे. परंतु कंपनीने अशी उत्पादने काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या पिशव्यांमध्ये वितरित करावी. 

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Post News
Post Office Scheme: फक्त व्याजातून १२ लाख, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; एकदा कॅलक्युलेशन जाणून घ्याच!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com