पराग ढोबळे
नागपूर : नागपूरमध्ये एक तीन महिन्याची चिमुकली कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ बेवारसपणे पडलेली आढळून आली आहे. कचरा वेचणाऱ्या महिलांना हि चिमुकली आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नागपूर (Nagpur) शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पवनसुत नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरात असलेल्या मोकड्या जागेवर कचरा टाकण्यात येत असतो. याठिकाणी प्लास्टिक गोळा करण्यासाठी महिला जात असतात. त्यानुसार परिसरात दुपारच्या सुमारास कचरा वेचायला गेलेल्या महिलेला लहान मुलं रडत असल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने महिला गेली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिलेने पोलिसात हा प्रकार सांगितलं.
सदर चिमुकली साधारण तीन महिन्याची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर तिच्या अंगावर काही जखमा असून चिखल लागलेल्या अवस्थेत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ चिमुकली आढळली. चिमुकलीवर सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून पोलीस चिमुकलीच्या पालकांचा शोध घेत आहेत. दरम्यान अनैतिक संबंधातून किंवा पारिवारिक वादातून मुलीला सोडल्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.