Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : गावी परतताना काळाचा घाला; बसची मोटारसायकलला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Dhule News : दोघेजण मोटारसायकलने कामानिमित्ताने शहादा येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर सायकलच्या सुमारास गावी जाण्यासाठी निघाले होते. याच वेळी अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे

Rajesh Sonwane

धुळे : शहादा येथे कामानिमित्ताने गेले असताना गावाकडे परत जात असताना समोरून येणाऱ्या बसने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहादा रस्त्यावर निमगुळ- टाकरखेडा या दरम्यान घडली आहे. दरम्यान अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

धुळे जिल्ह्यातील निमगूळ- टाकरखेडा या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात मंगल आसराम भिल (वय २३) व पावभा भिल (वय २२) असे मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान खर्दे येथील मंगल भील व पावभा भील हे दोघेजण मोटारसायकलने कामानिमित्ताने शहादा येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर सायकलच्या सुमारास गावी जाण्यासाठी निघाले होते. याच वेळी अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे.  

डोक्याला मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू 

मंगल भील व पावभा भील हे मोटरसायलने शहादाकडून दोंडाईचा कडे येत खर्दे गावी येत होते. याच वेळी राज्य परिवहन महामंडळाची शहादा आगाराची बस दोंडाईचाकडून शहादाकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यानंतर दोघेजण रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. दोघांनाही तातडीने दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. 

बस चालक फरार 

मोटारसायकलला धडक दिल्यानंतर बस चालक घटनास्थळी बस रस्त्यावर उभी करून फरार झाला. दरम्यान अपघातानंतर रस्त्यावर गर्दी जमली होती. मात्र घरातील दोन्ही कर्ते व्यक्ती गेल्याने कुटुंबावर मोठा आघात बसला आहे. तर गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान बस चालकावर गुन्हा दखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: बॉक्सर मेरी कोमच्या घरी चोरी, ३ अल्पवयीन मुलांना अटक; चोरीस गेलेल्या वस्तू जप्त

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेले शिंदेंचे आमदार, लाखोंची प्रॉपर्टी विकून केली मदत; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांना मदत करताना राजकारण करण्याची गरज नाही- एकनाथ शिंदे

नवी मुंबईत स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय; ६ हजारासाठी तरूणींवर दबाव, पोलिसांकडून पर्दाफाश

मध्य प्रदेशातील महाकालेश्वरच्या मंदिरात सर्वाधिक भक्त का जातात?

SCROLL FOR NEXT