Dhule Accident Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident : भीषण अपघात...बस- दुचाकीची धडक; दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू, बस पूर्ण जळून खाक

Dhule News : नागपूर- सुरत महामार्गावर आज सकाळी हा भीषण अपघात झाला. खासगी बस जळगावकडून धुळ्याकडे येत असताना नागपूर- सुरत महामार्गावर हा अपघात

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील फागणे येथे नागपूर- सुरत महामार्गावर खाजगी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर खाजगी बसने तात्काळ पेट घेतल्याची घटना घडली आहे. तर अपघातात दुचाकीस्वाराचा बसखाली आल्याचे जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

नागपूर- सुरत महामार्गावर आज सकाळी हा भीषण (Accident) अपघात झाला. खासगी बस जळगावकडून धुळ्याकडे येत असताना नागपूर- सुरत महामार्गावर हा अपघात झाला असून समोरून येणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसली. यात (Dhule) दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली फेकला गेल्याने चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अपघात झाल्यानंतर बसला देखील आग लागली. काही क्षणातच बस पूर्णपणे जाळून खाक झाली आहे. 

सदर अपघातामध्ये पेट घेतलेल्या बसमधील प्रवासी तात्काळ खाली उतरल्याने सर्वजण यातून बचावले आहेत. बस मात्र पूर्णतः जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य करण्यात आले आहे. तर या अपघातानंतर महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Land Scam : पुणे जमीन घोटाळा, पार्थ पवारांचे नाव वगळले?

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Manoj Jarange : हत्येची सुपारी देणारा नेता कोण? जरांगे पाटील करणार मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे, भाजप-शिवसेनेच्या आधी जाहीर केला उमेदवार

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

SCROLL FOR NEXT